शिरूर मध्ये एन.के.साम्राज्य ग्रुपचे वर्चस्व वाढविण्याकरीता जिवे ठार मारण्याचे कट, आरोपींना गुन्हे शाखा पोलिसांनी घातल्या बेड्या

शिरूर;दि. २६/०१/२०२१ रोजी श्री. प्रविण गोकुळ गव्हाणे यांनी शिरूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली, की निलेश उर्फ नानु चंद्रकांत कुलप, मुकेश उर्फ बाबु चंद्रकांत कुर्लप, गणेश चंद्रकांत कुर्लप, रा. कामाठीपुरा, शिरूर, महेंद्र येवले, रा. सोनारआळी शिरूर, गोपाळ संजय यादव, रा. पुणे, राहुल पवार, रा. रांजणगाव यांनी प्रविण गोकुळ गव्हाणे हा गोपाळ संजय यादव याचा खुन करणार आहे असा चुकीचा समज करून घेवन त्यांचे एन.के.साम्राज्य या ग्रुपचे वर्चस्व वाढविण्याकरीता फिर्यादीस जिवे ठार मारण्याचे उद्देशाने कट तयार केला.

त्या कटामध्ये अनोळखी ५ साथिदारांना सुपारी देवून दि. २६/०१/२०२१ रोजी सायंकाळी १८.००वा.चे सुमारास फिर्यादी हे त्यांचेकडील मोटार सायकलवरून निर्माण प्लाझा ते बाबुरावनगर रोडने जात असताना दोन अनोळखी इसमांनी व्हिजन इंटरनॅशनल स्कुलच्या समोर अॅव्हेंजर गाडीने ओव्हरटेक करून फिर्यादीचे गाडीस आडवी गाडी मारून थांबिवले तसेच पाठीमागून तीन अनोळखी इसमांनी डयुक गाडीवरून येवून फिर्यादीस घेरून फिर्यादीस जिवे ठार मारण्याचे उद्देशाने कोयत्याने फिर्यादीवर वार केला व फिर्यादीचे दिशेने फिर्यादीस जिवे ठार मारण्याचे उद्देशाने पिस्टलने पाठीमागून गोळ्या झाडून फिर्यादीचा खुन करण्याचा प्रयत्न केला.

१.गोपाळ यादव याने फिर्यादीस जिवे ठार मारण्याकरीता त्याचे साथिदार नामे २. शुभम सतिश पवार (रा. पापडेवस्ती, भेकराईनगर, पुणे) ३. अभिजीत उर्फ जपानी कृष्णा भोसले (रा. भेकराईनगर पुणे) ४. शुभम विजय पांचाळ (रा. हडपसर,पुणे) ५. निशांत भगवान भगत (रा. भेकराईनगर फुरसुंगी, पुणे) ६. आदित्य औदुंबर डंबरे, (रा. ससाणेनगर, हडपसर पुणे)  ७. शुभम उर्फ बंटी किसन यादव, (रा.गोंधळेनगर, हडपसर, पुणे) अशी आरोपींची नावे असून.

पोलिसांनी दिलेल्या माहितनुसार, गुन्हयातील आरोपी गोपाळ उर्फ गोप्या संजय यादव व त्यासोबत असणारे अभिजीत उर्फ जपानी कृष्णा भोसले यांना सासवड येथून ताब्यात घेवून त्याचेकडे गुन्हयाचे अनुशंगाने तपास केला असता, आरोपी अ.नं. २, ४ ते ७ यांना त्यांचे राहते घरून ताब्यात घेवून चौकशी केली असता आरोपी अनं. २ ते ६ यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जावून व आरोपी क. ७ याने गुन्हा करणेकरीता पिस्टल पुरवून गुन्हा केला असल्याचे निष्पन्न झाले आहे. पकडलेल्या आरोपींपैकी अभिजीत उर्फ जपानी कृष्णा भोसले हा हडपसर पो.स्टे.कडील खुनाचे प्रयत्नाचे गुन्हयात पाहिजे आरोपी आहे तसेच गोपाळ यादव याचे विरूध्द खुनाचा प्रयत्न, शुभम पवार याचे विरूध्द अवैद्य हत्यार बाळगल्याचा, अभिजीत उर्फ जपानी कृष्णा भोसले याचे विरूध्द खुन, खुनाचा प्रयत्न, दुखापत करणे, शुभम विजय पांचाळ याचे विरूध्द खुनाचा प्रयत्न, बेकायदेशीर हत्यार जवळ बाळगणे, निशांत भगत याचे विरूध्द दुखापत करणे, बेकायदेशीर हत्यार जवळ बाळगणे, आदित्य औदुंबर डंबरे याचेविरूध्द खुनाचा प्रयत्न करणे असे गुन्हे दाखल आहेत.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ.श्री. अभिनव देशमुख, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री.मिलींद मोहीते, उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. राहुल धस, पद्माकर घनवट, पोलीस निरीक्षक श्री. पद्माकर घनवट, स.पो.नि.श्री.पृथ्वीराज ताटे, पोसई शिवाजी ननवरे, सहा.फौजदार दत्तात्रय गिरमकर, पोहवा राजु पुणेकर, उमाकांत कुंजीर, जनार्दन शेळके, पोना. राजु मोमीण, अजित भुजबळ, विजय कांचन, गुरू जाधव, मंगेश थिगळे, पो.कॉ. धिरज जाधव, अक्षय नवले, बाळासाहेब खडके, दगडु विरकर, समाधान नाईकनवरे, पो.नि.श्री. आण्णासाहेब घोलप, स.पो.नि.श्री.राहुल घुगे, पो.कॉ.निलेश जाधव, उगले, डहाणे यांनी केली असुन.

सदर गुन्हयातील आरोपींनी तसेच एन.के.साम्राज्य ग्रुपचे सदस्यांनी अत्याचार केले बाबत काही तक्रारी असल्यास नागरीकांनी निर्भयपणे पुढे येवून तक्रार दयावी असे आवाहन पुणे ग्रामीण पोलीस दलाचे वतीने करण्यात आले आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.