पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आयुक्त पदी राजेश पाटील??

पिंपरी चिंचवड :पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आयुक्त पदी राजेश पाटील यांची वर्णी लागणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. सध्या चे आयुक्त श्रावण हर्डीकर याची देखील बढती झाली असल्याने त्यांच्या जागी राजेश पाटील आयुक्त म्हणून विराजमान होणार आहेे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली.

श्रावण हर्डीकर यांच्या कार्यकाळात सर्वांत महत्त्वाचा टप्पा ठरला तो बोगस ठेकेदार प्रकरण , कोरोनाच्या काळातील थेट खरेदी आणि आत्ता नुकताच ३८००कोटीच्या फाईल गायब होण्याचे प्रकरण अंगाशी येऊ नये म्हणून हर्डीकर यांनी बदली करून घेतली असल्याची चर्चा महापालिका वर्तुळात सुरू आहे.

ओडिशामध्ये प्रशासकीय सेवेत उल्लेखनीय काम करणारे राजेश पाटील २००५ मध्ये यूपीएससी परीक्षा पास केली आहे. त्यनंतर केंद्र सरकारच्या स्कील इंडिया उपक्रमांतर्गत त्यांनी काम पाहिले आहे. दरम्यान, पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांना पिंपरी-चिंचवड आयुक्तपदी नियुक्त करण्यात येईल, अशी चर्चा मध्यंतरी सुरू होती. मात्र, राजेश पाटील यांचे नाव आता आघाडीवर आहे.

राजेश पाटील यांचा थोडक्यात आढावा…

स्टॅटेस्टिकल सर्व्हिसेसमध्ये राजेश यांची निवड झाली होती. पण, त्यांना आयएएस अधिकारीच व्हायचे होते. त्यामुळे त्यांनी आपली मेहनत सोडली नाही. २००५मध्ये ते यूपीएससी पास झाले आणि त्यांची पहिली नियुक्ती ओडिशातील कोटापूरमध्ये अठगढ येथे विभागीय न्यायदंडाधिकारी म्हणून झाली. ओडिशामध्ये काम करताना २००८मध्ये महा नदीला पूर आला होता. त्यावेळच्या बचाव कार्यात राजेश पाटील यांचे खूप मोठे योगदान आहे. राजेश यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. राजेश यांनी आत्मचरित्रपर पुस्तकाचे लेखन केले असून, ‘ताई मी कलेक्टर व्हयनू’ हे त्यांचे पुस्तक खूप लोकप्रिय आहे.

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.