बेपत्ता तरुणाचा मृतदेह मांजरी रेल्वे फाटकाजवळ आढळल्याने खळबळ, तरूण कुविख्यात अरूण गवळी टोळीशी संबंधित असल्याची चर्चा

पुणे : येरवडा परिसरातून मागील आठवड्यापासून बेपत्ता असलेल्या तरुणाचा मृतदेह शुक्रवारी संध्याकाळी मांजरी रेल्वे फाटकाजवळ आढळल्याने एकाच खळबळ उडाली. हा खुनाचा प्रकारा असल्याचे प्राथमिक पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. दरम्यान मृत हा कुविख्यात अरुण गवळी याच्या टोळीशी संबंधित असल्याचे सांगितले जात आहे. मात्र पोलिसांनी अद्याप त्यास दुजोरा दिला नाही.

सुरेश राजीव रेगुंठा (वय 27, रा. शास्त्री नगर, येरवडा) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेश रेगुंठा हा येरवडा येथील शास्त्री नगरचा आहे. 25 जानेवारी रोजी तो बेपत्ता झाला असल्याची नोंद येरवडा पोलिसांकडे आहे. तो घरी न आल्याने त्याच्या नातेवाईकांनी येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. पोलीस पथकांकडून याबाबत माहिती काढण्याचे काम सुरु होते.

मात्र, आज सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास त्याचा मृतदेह मांजरी येथील रेल्वे गेट परिसरात मिळून आला. ही माहिती मिळताच हडपसर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तपासात हा सुरेश रेगुंठा असल्याचे समोर आले. त्यानंतर माहिती घेत असताना हा चार दिवसांपासून बेपत्ता असल्याचे समोर आले. मृताची पार्श्वभूमी, व संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरु आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.