पतीला ‘सॉरी’ मेसेज पाठवत महिलेची आत्महत्या, कोथरुड परिसरातील घटना

पुणे : कोथरूड परिसरात एका महिलेने पतीला ‘सॉरी’ असा एसएमएस पाठवत राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या आत्महत्येबाबत महिलेच्या नातेवाइकांनी संशय व्यक्त केला आहे.

प्रीती दीपक काकडे (वय 31, कोथरुड) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी कोथरुड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,प्रीती व त्यांचे पती कोथरुड येथील भुसारी कॉलनीत राहण्यास आहेत. त्यांचे पती नामांकित खासगी कंपनीत इंजिनीअर आहेत. त्यांना एक पाच वर्षांची मुलगी आहे. प्रीती या गृहिणी आहेत.पती-पत्नीमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला होता. शुक्रवारी सकाळी पती नोकरीवर गेले होते. त्यानंतर महिलेने पतीच्या मोबाइलवर ‘सॉरी’ असा मेसेज पाठवून घरात गळफास घेतला. मेसेज मिळाल्यानंतर पतीने तत्काळ घराकडे धाव घेतली

.त्यावेळी दरवाजा आतून बंद होता. त्याने थेट दरवाजा तोडला. तर आता मृतदेह दिसून आला. मृतदेह दोरी तुटून खाली पडला होता. त्यांनी उपचारासाठी प्रीती यांना ससून रुग्णालयात दाखल केले; परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यानंतर पतीने याची माहिती पोलिसांनी दिल्यानंतर ते घटनास्थळी दाखल झाले. परंतु कुटुंबीयांच्या आरोपामुळे या मृतदेहाचे नातेवाइकांच्या उपस्थितीमध्ये शवविच्छेदन केले जाणार आहे. महिलेने आत्महत्या केली, त्या वेळी त्यांची पाच वर्षांची मुलगी शेजारच्या खोलीत असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी कोथरूड पोलिस तपास करत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.