पिंपरी-चिंचवडचे आयर्नमॅन सडेतोड, रोखठोक कृष्ण प्रकाश यांच्यातील हळवा माणूस

पिंपरी-चिंचवड; पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी आयर्नमॅन किताब मिळवला आहे. मात्र एका तरुणीने ऐकवलेल्या कवितेनं त्यांच्या काळजालाही पाझर फुटला आणि त्यांनी आपल्या अश्रूंना मोकळी वाट करुन दिली.पळशी, ता. माण, जि. सातारा येथील ऋतुजा शांतीलाल पाटील नावाची तरुणी पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांना भेटायला आली असुन. तिने वडिलांच्या निधनानंतर आयुष्यात आलेल्या अनुभवांवर झुळूक नावाचं पुस्तक लिहिलं आहे. याच पुस्तकातील ‘देवा घरचा बाबा’ ही कविता तीनं कृष्णप्रकाश यांना ऐकवली.ऋतुजाची कविता ऐकताच कृष्णप्रकाश यांना अक्षरशः अश्रू अनावर झाले. उपस्थित पोलीस अधिकारी देखील यावेळी भावनिक झालेले पहायला मिळाले. कृष्णप्रकाश यांनी ऋतुजाच कौतुक करुन तिला देखील दिलं.

 

दरम्यान, कृष्णप्रकाश अत्यंत कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत, आपल्या सडेतोड आणि रोखठोक बोलण्यासाठी ते ओळखले जातात, मात्र आज ऋतुजाच्या कवितेमुळे कृष्णप्रकाश यांच्यातील हळवा माणूस देखील पहायला मिळाला.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.