स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत ५ स्टार मानांकन मिळविण्यासाठी विटा शहराची धडपड, हवेचे प्रदूषण रोखण्यासाठी बसवले अत्याधुनीक एअर प्युरीफायर मशीन

सांगली; मागील काही दिवसात कोरोना महामारी मुळे स्वच्छ्ता किती महत्त्वाची आहे हे वेगळ सांगायला नको, सांगली जिल्ह्यातील स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत ५ स्टार मानांकन मिळविण्यासाठी विटा शहराची धडपड उल्लेखनीय ठरत आहे.विटा शहरामध्ये वाढते हवेचे प्रदूषण रोखण्यासाठी अत्याधुनीक एअर प्युरीफायर मशीन बसविले जात आहे.

गुरूवारी २८ जानेवारी रोजी विटा नगरपालीकेचे जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांच्या हस्ते एअर प्युरीफायर मशीनचे उद्घाटन करण्यात आले.तसेच वाढते प्रदूषन रोखण्यासाठी ई व्हेइकलचा वापर केला जावा यासाठी ईव्हेइकलचे प्रमोशन करण्यात आले.असे एअर प्युरीफायर मशीन बसविणारे सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील विटा शहर हे महाराष्ट्रातील एकमेव शहर ठरत आहे त्यामुळे सर्वत्र शहराचे कौतुक होत आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.