हाॅटेलमधील बिलाच्या वादातून डोक्यात बिअरची बाटली फोडली; काळेवाडीतील घटना

पिंपरी चिंचवड : हॉटेलमध्ये दारू पिण्यासाठी आलेल्या ग्राहकासोबत बिलाच्या कारणावरून वाद झाला. त्यात हॉटेल मालक आणि तीन वेटरने मिळून ग्राहकाला बेदम मारहाण बिअरची बाटली डोक्यात मारून जखमी केले. याबाबत हॉटेल मालक आणि तीन कामगारांना अटक करण्यात आली आहे. ही घटना गुरुवारी (दि. 28) रात्री बारा वाजता काळेवाडी येथील अनमोल बिअर बार रेस्टोरंट येथे घडली.

सुदर्शन बबन लोखंडे (वय 38, रा. काळेवाडी) यांनी याबाबत वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनमोल हॉटेलचा मालक मोनिश गोविंद शेट्टी (वय ४५, रा. पाषाण सुस रोड, पुणे), मिथुन विष्णू बिसवास (वय २८), विश्वनाथ मखन घोडाई (वय ३२), शांताराम सर्वत्तम शेट्टी (वय ६१, तिघे रा. काळेवाडी) याना अटक करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी लोखंडे त्यांच्या मित्रांसोबत काळेवाडी येथील अनमोल हॉटेलमध्ये दारू पिण्यासाठी गेले होते. त्यावेळी लोखंडे आणि हॉटेलचे मालक यांच्यात बिलावरून वाद झाला. आरोपींनी लोखंडे यांना शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. बिअरची बाटली लोखंडे यांच्या डोक्यात मारून त्यांना गंभीर जखमी केले. एक कामगार चाकू घेऊन लोखंडे यांच्या अंगावर मारण्यासाठी आला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.