पुणे-बंगळुरू महामार्गावर कराडजवळ भीषण अपघात; पुण्यातील तीन पैलवानांचा जागीच मृत्यू

पुणे :  पुणे-बंगळूरु महामार्गावर कराडजवळ दोन मोटारींमध्ये भीषण अपघात झाला असून यामध्ये चार जण ठार तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये पुण्यातील तीन पैलवानांचा समावेश आहे.

स्वप्नील शिंदे(फलटण) ,राहुल दोरगे, (यवत),आणि रविराज साळुंखे (सच्चईमाता डोंगर कात्रज) असे अपघातात मृत्यू झालेल्या पैलवानांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-बंगळुरू महामार्गावरील कराड येथील पाचवड फाट्याजवळ इनोव्हा आणि स्विफ्ट गाडीची धडक झाली.  यामध्ये चार जण ठार तर पाच जण जखमी झाले आहेत. जखमींना कराडच्या कृष्णा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ठार  झालेल्यांमध्ये तीन पैलवान असल्याचे समजते. तसेच, ते पुण्यातील कात्रज येथील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती मिळते.

महामार्गावर कराड जवळच्या आटके टप्पा येथे हा अपघात झाला असून अपघातग्रस्त एक मोटार कोल्हापूरवरुन पुण्याच्या दिशेने जात असताना पाठीमागून वेगात आलेल्या मोटारीने पुढे असणाऱ्या मोटारीला पाठीमागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की पुढील मोटार पलटी झाली.

या भीषण अपघातात दोन्ही मोटारीतील मिळून चार जण ठार झाले आहेत. यातील जखमींना कराडच्या कृष्णा हॅास्पिटल येथे दाखल करणात आले आहे. त्यांच्यावर तातडीचे उपचार सुरु करण्यात आले आहेत. घटनास्थळी महामार्ग पोलीस तसेच कराड पोलीस दाखल झाले असून पुढील कारवाई सुरु आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.