प्रेक्षकांसाठी खुशखबर; चित्रपटगृहे आणि नाट्यगृह 1 फेब्रुवारीपासून 100 टक्के क्षमतेनं होणार सुरु

मुंबई  : कोरोनामुळे प्रशासनानं सांगितलेल्या नियमानुसार चाललेल्या चित्रपटगृह चालकांना केंद्र शासनानं हिरवा कंदील दाखवला आहे. त्यांनी आता 100 टक्के क्षमतेनं चित्रपटगृह सुरु करण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे चित्रपटगृह चालकांनी समाधान व्यक्त केले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांना मोठ्या आर्थिक समस्येला सामोरं जावं लागत  होते. यानिमित्तानं परिस्थिती पूर्वपदावर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सरकारनं पुन्हा नवी काही नियमावली जाहीर केली असून त्यात चित्रपटगृह चालकांना सवलती देण्यात आल्या आहेत.

1 फेब्रुवारीपासून 100 टक्के क्षमतेनं थिएटर सुरु होणार आहेत. कोविडच्या दरम्यान थिएटर चालकांपुढे मोठा प्रश्न निर्माण झाला होता. कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी सहा महिन्यांहून अधिक काळ थिएटर बंद ठेवली होती. थिएटर सुरु करावी म्हणून थिएटर संघटनेकडूनही वेळोवेळी निवेदनं शासनाला देण्यात आली होती. त्यावर सरकारनं 50 टक्के क्षमतेनं ती सुरु करण्यास परवानगी दिली होती. मात्र प्रेक्षकांची संख्या आणखीनच कमी झाल्यानं पुन्हा मोठा प्रश्न निर्माण झाला. यावेळी सरकारनं सध्याच्या परिस्थितीचा अंदाज पाहता 100 टक्के क्षमतेनं ती सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.

गृहमंत्रालयाच्या परवानगीनंतर माहिती व प्रसारण मंत्रालयाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. सध्या 100 टक्के क्षमतेनं सुरु असलेली चित्रपटगृह आणि नाट्यगृह 1 फेब्रुवारीपासून पूर्ण क्षमतेनं सुरु होतील. कोरोना काळआत संसर्गाचा फैलाव रोखण्यासाठी देशभरातील चित्रपटगृह आणि नाट्यगृह बंद ठेवण्यात आली होती. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये चित्रपटगृह, मल्टीप्लेक्स आणि नाट्यगृह 50 टक्के प्रेक्षकांच्या उपस्थित सुरु करण्यास परवानगी देण्यात आली होती.व माहिती व प्रसारण मंत्रालयाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. मंत्रालयाच्या एसओपीनुसार हॉल, वेटिंग रूम आणि सामान्य भागात आणि चित्रपटगृहाच्या बाहेरही लोकांमध्ये नेहमीच 6 फूट शारीरिक अंतर ठेवणं बंधनकारक असेल. सभागृहात प्रवेश करणार्‍यांना संपूर्ण वेळ फेसकव्हर शिल्ड किंवा फेस मास्क घालणं आवश्यक आहे

हॉलच्या एन्ट्री आणि एक्झिट पॉईंटवर टच फ्री मोडमध्ये हँड सॅनिटायझर असणं सक्तीचं असेल. चित्रपट पाहण्यासाठी येणार्‍या लोकांना सूचनाही देण्यात आल्या आहेत. उदाहरणार्थ, खोकला किंवा शिंकताना त्यांना त्यांच्या चेहऱ्यावर विशेषत: तोंड आणि नाकावर टिश्यू पेपर किंवा रुमाल ठेवावा लागेल आणि येथे आणि तेथे टिश्यू पेपर टाकू नये, अशा सूचना जारी करण्यात आल्या आहेत.

मार्गदर्शक सूचनांनुसार सिनेमा हॉलच्या आत किंवा बाहेर थुंकण्यास बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय, आरोग्य सेतू अ‍ॅप फोनमध्ये ठेवणे बंधनकारक असेल. प्रत्येक कार्यक्रमानंतर सिनेमा हॉल, मल्टिप्लेक्स आणि थिएटर स्वच्छ करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. चित्रपटगृहातील व्यवहार डिजिटल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

 

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.