लोणी काळभोर पोलीस स्टेशनला फिर्याद द्यायला आलेल्या महिलेचा अपघात, झाला होता शेजाऱ्यांशी किरकोळ वाद
थेऊरफाटा (गणेश धुमाळ) – थेऊरफाटा ते लोणीकंद राज्यमहामार्ग क्रं ५८ मार्गावर थेऊर गावातील गणेशवाडी नजीक भरधाव टॅकरने ऑटोरिक्षास जोरदार ठोसर मारली यात एक महिला जागीच ठार झाली तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले जखमींना ससून रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले आहे.
लोणी काळभोर चे पोलिस निरीक्षक सुरज बंडगर यांनी दिलेल्या माहितीनुसार काल शुक्रवारी रात्री शेजा-याशी किरकोळ वाद झाल्याने तक्रारदार मंदार राजु सकट आपली बहिण अनितासह लोणी काळभोर पोलिस स्टेशनला आले तेथे त्यांचा मानलेला भाऊ असलम हा पुण्याहून रिक्षा घेऊन आला होता.तेथील काम झाल्यानंतर मंदार सकट, आई, चुलती व अनिताचा मुलगा त्यांनी आणलेल्या रिक्षातून थेऊर येथे पोहोचले तर अनिता व असलम हे त्यांनी आणलेल्या रिक्षातून पाठीमागील रिक्षाने येत होते.
मंदार घरी पोहचल्यानंतर रात्री १२:३० वा सुमारास शेजारी राहणारे तनुजा भहुले हिच्या मोबाईलवर अनोळखी नंबर वरुन फोन आला की, थेऊर फाटा ते थेऊर रोडवर पावर हाऊस वाशिंग सेंटर समोर रिक्षा व टॅन्करचा अपघात झाला आहे तु लवकर ये असे सागीतले.मंदार अपघात झाले त्या ठिकाणी पोहोचला असता एम एच १२ एच डि २१२० नंबर असलेला इंधन टँकर लोणी कंद – थेऊर फाटा या बाजुने येणा-या टँकरने रिक्षास समोरासमोर धडक देवुन अपघात करुन टँकर पुढे जावुन उजव्या बाजुस उभा होता तिन आसनी रिक्षा न एम एच १२ ई क्यु ०४५३ हि रस्त्याचे बाजुस पलटी होवुन पडलेली दिसली. असलम व रिक्षा चालक यांना मार लागल्याने ते बेशुद्ध अवस्थेत पडलेले दिसले.व बहिन अनिता लोंढे निपचित पडली होती ती जागीच मयत झालेची दिसत होती तेव्हा जमलेल्या लोंकाचे मदतीने असलम व रिक्षा ड्रायव्हर यांना उपचारासाठी ससुन रुग्णालयात पाठवुन दिले.
अपघातानंतर टँकर चालक तेथून पळून गेला होता. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक नितीन सुद्रीक करीत आहेत.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!