वाहतूक पोलीसाला लोखंडी रॉडने मारहाण करणाऱ्या दोन आरोपींना अटक

पिंपरी चिंचवड : कंटेनर मागे घेण्यावरून झालेल्या वादातून दोघांनी मिळून एका वाहतूक पोलिसाला लोखंडी रॉडने मारहाण केली. मारहाण करणाऱ्या दोघांना गुन्हे शाखा युनिट तीनच्या पोलिसांनी सिसिटिव्हीच्या साह्याने अटक केली आहे. हे आरोपी कल्याणला पळून जाण्याच्या तयारीत होते.

रोहित बाबू साळवी (वय वर्ष 20 रा आ सम्राट अशोक बिल्डिंग समोर , रेल्वे स्टेशन समोर, खोली न 303 कल्याण, ठाणे ) हर्षदीप भारत कांबळे (वय 22 वर्ष रा रूम न 6, गणपती चाळ चाळ no 7 नादिवली इस्ट कल्याण, ठाणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस शिपाई रवींद्र नामदेव करवंदे (वय 30) असे मारहाण झालेल्या पोलिसाचे नाव आहे. त्यांनी याबाबत चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास चाकण वाहतूक विभागात कार्यरत असलेले पोलीस शिपाई करवंदे चाकण चौकात वाहतूक नियमन करत होते. त्यावेळी कंटेनर मागे घेण्याच्या कारणावरून करवंदे आणि आरोपी यांच्यात वाद झाला. त्यावरून आरोपींनी करवंदे यांना लोखंडी रॉडने मारून जखमी केले. मारहाण केल्यानंतर आरोपी कल्याण येथे पळून जाण्याच्या तयारीत होते. दरम्यान पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांनी गुन्हे शाखेला याबाबत सूचना देऊन आरोपींचा मग काढण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासात आरोपींची ओळख पटवली. त्यानंतर दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या विरोधात सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.