विनापरवाना अवैधरित्या दारु व बिअरची विक्री करणा-या चायनिज सेंटरवर पोलिसाचा छापा

पिंपरी चिंचवड : विनापरवाना अवैधरित्या दारु व बिअरची विक्री करणा-याा गावठी कट्टा चायनिज अॅण्ड फास्ट फुड सेंटरवर पिंपरी-चिंचवड सामाजिक सुरक्षा पथकाने छापा मारून दोन जणांवर शिरगांव पोलीस चौकीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडून  १२ हजार ६८५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

चायनिज सेंटर चालक कुमार मनोहर मंडलीक (वय ३३ वर्षे रा. गहुंजेगांव), चायनिज सेंटर मालक नितीन धर्माजी बोडके वय ३० वर्ष (रा. सदर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार,मावळ तालुक्यातील गहुंजेगांव मंत्रा प्रॉपर्टीज येथील गावठी कट्टा चायनिज अॅण्ड फास्ट फुड सेंटर तसेच चायनिज सेंटर मालक नितीन बोडके यांच्या घरात विनापरवाना अवैधरित्या देशी-विदेशी दारु बाळगुन विक्री केली जात आहे. अशी माहिती पोलिसाचा मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा मारला. पोलिसांनी २ हजार ६९० रुपये रोख रक्कम, ३ हजार ९९५ रुपये किमतीच्या देशी-विदेशी दारू व बिअर बॉटल, ६ हजार रुपये किमतीचा मोबाईल असा एकूण १२ हजार ६८५ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपीविरुद्ध यांचे विरुध्द शिरगाव पोलिस चौकीत गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास शिरगाव पोलीस  करीत आहे.

 

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.