जळगावमध्ये मुलीच्या स्कार्फने गळफास घेत २० वर्षीय तरूणाची आत्महत्या

जळगाव : कार्यक्रमासाठी बोलवायला गेलेल्या गल्लीतील मित्राला थोड्या वेळाने येतो, असे सांगून २० वर्षीय तरुणाने राहत्या घरात मुलीच्या स्कार्फने गळफास घेतला. ही घटना शनिवारी सकाळी ९ वाजता उघडकीस आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

नीलेश दगडू वाघ (२०) अस आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.नीलेश याने आत्महत्या का केली याचे कारण स्पष्ट झालेले नाही, मात्र तो पोलिसांच्या रेकॉर्डवर होता.

मिळालेल्या माहितीनुसार,मृत  नीलेश वाघ हा स्लाईडींगचे दरवाजे व खिडक्यांचे हातमजुरीवर कामे करायचा. शनिवारी गल्लीत कार्यक्रम असल्याने सकाळी ७.३० वाजता शेजारचा मित्र नीलेशला घरी बोलावण्यासाठी गेला. त्यावेळी थोड्यात वेळात येतो असे त्याने सांगितले. ९ वाजले तरी नीलेश आला नाही म्हणून हा मित्र परत बोलवायला गेला असता त्याने घरात मुलींच्या स्कार्फच्या सहाय्याने  गळफास घेतलेल्याचे दिसून आले. या घटनेची माहिती मिळताच बाहेर धुणीभांडी करायला गेलेली आई धावतच आली. मुलाला पाहून तिने एकच हंबरडा फोडला. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सुधीर साळवी, मुदस्सर काझी यांनी घटनास्थळ गाठून तरुणांच्या मदतीने मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविला.

दरम्यान, नीलेश याच्यावर नवरात्रीच्या काळात चॉपर हल्ला झाला होता. त्याशिवाय त्याच्याविरुध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात एक गुन्हाही दाखल आहे. सहायक पोलीस निरीक्षक अमोल मोरे, मिलींद सोनवणे, सदानंद नाईक यांनी पंचनामा केला. घरात चिठ्ठी व इतर काही संशयास्पद आढळून आले नाही. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.