नात्यातील महिलेला वाईट हेतूने खुणावल्याच्या संशयातून तरुणाचा अपहरण करून खून
पिरंगुट : नात्यातील महिलेला वाईट हेतूने खुणावल्याच्या संशयातून मुळशी तालुक्यातील पिरंगुट येथील तरुणाने तीन साथीदारांच्या मदतीने एका तरुणाचे अपहरण करून खून केला. त्यानंतर त्याचा मृतदेह घोल येथे नेऊन जाळला.
राहुल काशिनाथ इंगवले (वय 32), असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी आकाश विजय केदारी (वय 21, रा. पिरंगुट), विक्रम पंढरीनाथ जगताप (वय 21, रा. पिरंगुट), प्रमोद भीमराव कांबळे (वय 30, रा. कासार आंबोली) व शेखर बाळासाहेब केदारी (वय 23, रा. पिरंगुट), या संशयित आरोपींना पौड पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्यांना सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. याबाबत गीता दीपक इंगवले यांनी फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाश केदारी, शेखर केदारी, विक्रम जगताप व प्रमोद कांबळे यांनी राहुल याचे बुधवारी (ता. 24) सायंकाळी कासार आंबोली येथून मोटारीतून अपहरण केले. त्यानंतर त्याला कासार आंबोली येथील खडी मशिन परिसरात नेण्यात आले.त्याठिकाणी कोयत्याने डोक्यात, गळयावर वार करून खुन केला व तो मेल्याची खात्री झालेवर त्याचे बॉडीची विल्हेवाट लावण्यासाठी त्यांचेकडील वरील कारमध्ये घेवून जावून मौजे घोल ता.वेल्हा जि.पुणे गावचे हद्दीत गारजाईकडे जाणारे रोडच्या दिशेने ३०० मीटर अंतरावर घेवून जावून रोडच्या खाली असलेल्या सिमेंटच्या पाईपमध्ये टाकून त्याचा मृतदेह घोल येथे नेऊन जाळण्यात आला. पौड पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास करून वरील चार आरोपींना अटक केली.
सदरची कामगिरी डॉ. अभिनव देशमुख (पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण), विवेक पाटील (अपर पोलीस अधीक्षक,पुणे ग्रामीण), श्रीमती सई भोरे पाटील (उप विभागीय पोलीस अधिकारी हवेली विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली अशोक धुमाळ पोलीस निरीक्षक, पौड पोलीस स्टेशन, विनायक देवकर सहा. पोलीस निरीक्षक यांनी केली असून सदर गुन्हयाचे तपासमध्ये सहा.पोलीस उप निरीक्षक संतोष कुंभार,सचिन शिंदे,पोलीस हवालदार शंकर नवले, नितीन रावते, सादिक इनामदार, पोलीस नाईक जय पवार, रविद्र नागटिळक, सुहास देवकाते, पोलीस कॉन्स्टेबल अनिकेत सोनवणे, तुषार भोईटे, सिध्देश पाटील यांनी कामगिरी केलेली आहे.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!