प्रॅंकच्या नावाने अश्लील व्हिडिओ करायचे ; 3 जणांना अटक

मुंबई :महाराष्ट्र पोलिसांच्या मुंबई गुन्हे शाखेच्या सायबर सेलने  मोठी कारवाई केली आहे. प्रॅंकच्या नावाने अश्लील व्हिडिओ  बनवून पैसे कमवणाऱ्या रॅकेटचा मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी सुशिक्षित तीन जणांना अटक केली आहे. कोरोना काळात या आरोपींनी 17 युट्यूब चॅनेलवर 300 हून अधिक व्हिडिओ अपलोड करून कोट्यवधी रुपये कमवले असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

मुकेश गुप्ता (29), प्रिन्स पुमार साव (23) आणि जितेंद्र गुप्ता (25) असे तिन्ही आरोपींची नावे आहेत. मुकेश गुप्ता ठाण्यात एक कोचिंग क्लास चालवतो, जिथे 300 हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेतात. या ठिकाणी शिकायला येणाऱ्या मुलांचेही व्हिडिओ त्याने आपल्या चॅनलवर अपलोड केले आहेत. दुसरा आरोपी जीतू गुप्ता हा बीएचएमएसचा विद्यार्थी आहे. तर, तिसरा आरोपी नटखट प्रिन्स हा बीएमएमचा विद्यार्थी असून 2008 मध्ये इयत्ता दहावीत असताना त्याला 98 टक्के गुण मिळाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार,अश्लील व्हिडिओ बनवण्यासाठी आरोपी काही मुलींना तयार करायचे. त्यानंतर सार्वजनिक ठिकाणी या व्हिडिओचे चित्रिकरण केले जात होते. हे व्हिडिओ जास्तीत जास्त 10 ते 15 मिनिटे असायचे.आरोपी तरूणींना अभिनयाच्या बहाण्याने बोलवून घ्यायचे. त्यांना 500 ते 1500 पर्यंत पैसे ठरवले जायचे. त्यानंतर अश्लील व्हिडिओ बनवण्यासाठी सार्वजनिक ठिकणी म्हणजे बॅन्ड स्टॅन्ड, रॉक गार्डन, कार्टर रोड, अक्सा बीच, गिराई बीच यांसह महापालिकेच्या मैदानात घेऊन जात होते. त्याठिकाणी चित्रिकरण केल्यानंतर तो व्हिडिओ यूट्युब, फेसबूकवर अपलोड करायचे. त्यांनी बनवलेल्या या व्हिडिओला जवळपास 15 कोटी व्ह्यूज मिळत होते. महत्वाचे म्हणजे, त्यांनी तयार केलेल्या व्हिडिओत तरूणींच्या खाजगी भागाला अतिशय चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला गेला जात होते.

तसेच व्हिडीओ प्रसारित केल्यानंतर त्याची भीती दाखवून शारीरिक संबंध ठेवण्यासाठी ते तरुण धमकावतदेखील असल्याची तक्रार पाच पीडित मुलींनी सायबर पोलिसांकडे केली होती. याची तत्काळ गंभीर दखल घेत सायबर पोलिसांनी तांत्रिक तपास करून असे अश्लील व्हिडीओ प्रसारित करणाऱ्या या तिघांना पकडले.

आरोपी 17 यू टयूब चॅनेल आणि फेसबुक पेजच्या माध्यमातून असे अश्लील व्हिडीओ प्रसारित करीत होते. पँक व्हिडीओ बनवत असल्याचे सांगत हे तिघे सार्वजनिक ठिकाणीच महिला, तरुणी तसेच अल्पवयीन मुलींशी अश्लील पृत्य करायचे. मग मोबाईलवर त्याचे चित्रीकरण करून ते प्रसारित करायचे. असे.करून ते लाइक्स आणि व्हुवर वाढवायचे. त्यामुळे त्यांना दोन कोटींहून अधिक रक्कम मिळाली आहे. त्यांचे यू टयूब चॅनेल बंद.करण्यासाठी पत्रव्यवहार करण्यात आला असल्याचे गुन्हे शाखेचे सहआयुक्त मिलिंद भारांबे यांनी सांगितले.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.