धक्कादायक, वसईत NGOच्या नावाखाली सुरू होते सेक्स रॅकेट, पोलीसांनी पर्दाफाश करत केली दोन मुलीची सुटका

मुंबई : वसईच्या उच्चभ्रू वस्तीत एनजीओच्या नावाखाली सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पोलीसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी एका महिलेला अटक करण्यात आली असून दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे

मिळालेल्या माहितीनुसार, वसईच्या कृष्णा टाऊनशीप या उच्चभ्रू परिसरात आरोपी महिला सेक्स रॅकेट चालवत असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाला मिळाली होती. त्यानुसार मंगळवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास एक बोगस ग्राहक पाठवून तिथे सेक्स रॅकेट सुरू असल्याची खातरजमा करून घेतली. त्यानंतर पोलिसांनी छापा टाकून या सेक्स रॅकेटचा भांडाफोड केेला. या कारवाईदरम्यान दोन पीडितांची सुटका करण्यात आली. वसईत सेक्स रॅकेट सुरु असल्याची जोरदार चर्चा होती. एनजीओच्या नावाखाली काही महिला सेक्स रॅकेट चालवत असल्याचे उघड झाले आहे.

सेक्स रॅकेट चालवणाऱ्या एका महिलेला पोलिसांकडून अटक करण्यात आली, अशी माहिती मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाचे अनैतिक मानवी वाहतूक शाखा पोलीस निरीक्षक भास्कर पुकळे यांनी दिली.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.