व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसला तलवारी आणि घातक शस्त्रांचे फोटो ठेवणाऱ्या सराईतासह दोघांना अटक

पुणे :  तलवारी अन तीक्ष्ण हत्यारांचे व्हाट्सअप स्टेट्सला ठेवून जनता वसाहतीत दहशत निर्माण करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना दत्तवाडी पोलिसांनी सापळा रचून अटक केली. ते सततच तीक्ष्ण हत्यारांचे फोटो ठेवत असल्याचे समोर आले आहे.

अमर लक्ष्मण गायकवाड (वय 23, रा. मनपा शाळेसमोर, जनता वसाहत) व भीमा शत्रूघ्न शिंदे (वय 22, वाघजाई मित्रमंडळ, जनता वसाहत) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी दत्तवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसद्वारे गुन्हेगारी किंवा दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाईचा बडगा उगारला जात आहे. दरम्यान, दत्तवाडीत दोघेजण व्हॉट्सअप स्टेट्सला तलवारी व घातक हत्यारांचे फोटो ठेवून दहशत निर्माण करत असून त्यांच्याकडे हत्यार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

त्यानुसार पथकाने दोघांना अटक केली. त्यांच्याकडील तलवार व पालघन जप्त करण्यात आले आहे. अमर गायकवाड सराईत गुन्हेगार असून काही दिवसापासून तो व्हॉट्सअपला सतत शस्त्राचे फोटो ठेवत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.