पुणे पोलीस आयुक्तांचा संघटीत गुन्हेगारांना आणखी एक दणका ! मुनाफ पठाण टोळी विरुध्द मोक्का कायदयान्वये कारवाई
पुणे : पुणे शहरातील गुन्हेगारी टोळ्यांचे वर्चस्व मोडून काढण्यासाठी पुणे पोलिसांकडून मागील काही दिवसांपासून सातत्याने कारवाई सुरू आहे. पुणे पोलिसांनी अनेक गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का लावण्यात आला आहे. त्याचप्रमाणे आता संघटीत गुन्हेगारांना आणखी दणका देत कोंढव्यातील मुनाफ पठाण टोळीवर पोलीस आयुक्तांनी कारवाई केली आहे. बंडू आंदेकरवर मोक्का लावल्यानंतर कृष्णाराज आंदेकर याचा या मोक्कात समावेश आहे.
टोळी प्रमुख मुनाफ रियाज पठाण (वय २३ वर्षे रा. डोके तालीम जवळ ३१० नाना पेठ पुणे ), कृष्णाराज सुर्यकांत आंदेकर (वय ३१ वर्षे रा.डोके तालीम जवळ ३१० नाना पेठ पुणे), विराज जगदीश यादव (वय २५ वर्षे रा. आदित्य रेसिडन्सी फ्लॅट नं. १०४ हांडेवाडी रोड आनंदनगर हडपसर पुणे), आवेज आशपाक सय्यद (वय २० वर्षे रा.२७१ गणेश पेठ सागर हॉटेल शेजारी पुणे), अनिकेत ज्ञानेश्वर काळे (वय २५ वर्षे,रा. ३०१ डोके तालीम जवळ नाना पेठ पुणे), अक्षय नागनाथ कांबळे (वय २३ वर्षे, रा. ससाणेनगर लेन नं.१५ साईबाबा मंदिराशेजारी हडपसर पुणे), शहावेज उर्फ शेरु अब्दुल रशिद शेख (वय ३४ रा. ६७७ गरुवार पेठ मक्का मस्जिदजवळ पुणे), ओमकार शिवप्रसाद साळुखे (वय – २१ वर्षे रा. ६० नाना पेठ, डोके तालीम जवळ, पुणे), अमन युसुफ खान (वय-२० वर्षे रा.९,नाना पेठ डोके तालीम जवळ उदयकांत आंदेकर यांचे रिध्दी सिध्दी बिल्डींग मध्ये पुणे), यश सुनिल ससाणे (वय २० वर्षे रा. सय्यदनगर गल्ली नं १५ हडपसर पुणे) अशी मोक्कानुसार कारवाई करण्यात आलेल्याची नावे आहेत. या सर्वांना अटक करण्यात आली आहे.
मुनाफ पठाण हा टोळी प्रमुख आहे. दरम्यान, जानेवारी महिन्यात त्यांनी कोंढवा परिसरात एका तरुणावर गोळीबार केला होता. यात एक तरुण जखमी झाला होता. तो पोलीस ठाण्यात जात असताना पुन्हा पाठलाग करून त्याला जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या टोळीवर कोंढवा पोलीस ठाणे तसेच फरासखाना, समर्थ, हडपसर पोलीस ठाणे येथे शरिराविरुध्दचे ०९ गुन्हे दाखल असुन त्यांचेवर प्रतिबंधक कारवाई करुन देखील त्यांनी पुन्हा शरिराविरूध्दचे गंभीर गुन्हे केले आहेत. त्यांची पुणे शहर आयुक्तालयात दहशत असुन ते लोकांना दमदाटी करणे लुटमार करणे असे प्रकार करीत असे.आरोपी नामे मुनाफ रियाज पठाण याने आपल्या अधिपत्याखाली इतर आरोपी यांना सोबत घेवुन स्वतःची संघटीत टोळी तयार करून अपराध केलेले असुन यातील आरोपी यांनी संघटीतपणे शरीराविरूध्दचे गंभीर गुन्हे वारंवार केलेले आहेत.
यामुळे या टोळीवर मोक्काची कारवाई करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ निरीक्षक सरदार पाटील यांनी सादर केला होता. परिमंडळ पाचच्या उपायुक्त नम्रता पाटील यांनी या प्रस्तवाची छाननी केली व तो अप्पर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण यांच्याकडे सादर केला. त्यानुसार पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार चव्हाण यांनी मोक्काची कारवाई केली आहे.
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पदभार स्वीकारल्यापासून आतापर्यंत २० टोळ्यांविरूद्ध मोक्कानुसार कारवाई केली असून चालु वर्षातील ही १४ वी मोक्का कारवाई आहे.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!