टाकवे बुद्रुक मध्ये कोरोनाचा मृत्यू?
कामशेत;कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने दिलेल्या नियमांची टाकवे बुद्रुक मध्ये पायमल्ली झालेली दिसून येत आहे. टाकवे बुद्रुक मध्ये केंद्र सरकारने दिलेल्या स्वच्छ भारत मिशनचे देखील तीन तेरा वाजलेले दिसून येत आहेत.
टाकवे बुद्रुक मध्ये कचऱ्याचे साम्राज्य पसरलेले आहे. महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना राज्य सरकारने कोरोनाचे योग्य ते नियम घालून दिलेले असताना देखील टाकवे बुद्रुक ग्रामपंचायतीचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे.
कचऱ्याचे लवकरात लवकर योग्य ते नियोजन करून टाकवे बुद्रुक गावाला कचऱ्याच्या साम्राज्यातून मुक्त करा असा संताप गावाकऱ्यांनी व्यक्त केला आहे.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!