वर्षभरात भारत टोलनाकामुक्त करणार, नितीन गडकरींची लोकसभेत मोठी घोषणा
नवी दिल्ली : केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी देशभरातील टोलनाक्यांसंदर्भात महत्वाची घोषणा केलीय. येत्या वर्षभरात देशातील सर्व टोल नाके बंद केले जातील, आता प्रत्येक गाडीमध्ये जीपीएस व्यवस्था बसवण्यात येणार असून त्या आधारे टोलची वसूली करण्यात येईल अशी माहिती केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. लोकसभेतील प्रश्नोत्तराच्या तासामध्ये खासदारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर उत्तर देताना ते बोलत होते.
केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, “या आधीच्या सरकारांनी अनेक ठिकाणी, अनेक शहरांत अन्यायी पद्धतीने टोलनाके बसवले. त्या आधारे टोल चोरी मोठ्या प्रमाणात करण्यात येत होती. त्यामुळे येत्या वर्षभरात देशातील सर्व टोल नाके बंद करण्यात येतील. आता टोल वसूलीसाठी एक नवी जीपीएस आधारित कलेक्शन यंत्रणा आणण्यात येणार आहे. ही यंत्रणा सरकारच्या अंतिम टप्प्यात आहे. ही लागू झाल्यास वाहनांना टोलनाक्यावर थांबण्याची गरज नाही. यामुळे वाहनांची संख्या, ये-जा असा प्रवास देखील कळू शकणार आहे. टोलची रक्कम वाहनचालकाच्या अकाऊंटमधून पैसे कट करुन घेतली जाईल.
रशियन सरकारचे मदतीने भारत सरकारने जीपीएस आधारित प्रणाली आणली आहे. जी दोन वर्षात भारत टोलनाकामुक्त करेल. यामुळे टोलनाक्यावर होणारी गर्दी कमी होईल. तसेच टोल नाक्यांच्या देखभालीवर होणार सरकारचा खर्च कमी होणार आहे. एका कार्यक्रमात गडकरींनी यासंदर्भात माहिती दिली.
आता सर्व कमर्शिअल वाहने ही ट्रॅकींग सिस्टिमसहीत येतील. जुन्या वाहनांमध्ये जीपीएस लावण्यासाठी सरकार योजना आखत आहे. जीपीएस टेक्नोलॉजीमुळे नॅशनल हायवे टोलची वसूली 5 वर्षात 1 लाख 34 हजार कोटींनी वाढू शकते. तसेच व्यवहारातही पारदर्शकता येईल.
गडकरींच्या या घोषणेमुळे आता टोल नाक्यावर टोल भरण्यासाठीच्या भल्यामोठ्या रांगेपासून प्रवाशांची सूटका होणार आहे. त्यामुळे प्रवासाचा वेळही वाचणार आहे
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!