पिस्तुल घेऊन फिरणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक, दोन पिस्तुल व दोन काडतुसे जप्त

पुणे : पिस्तुल घेऊन फिरणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे.त्यांच्याकडून १ लाख २२ हजार रूपये किमतीच्या दोन पिस्तुल व दोन काडतुसे जप्त करण्यात आले आहेत.ही कारवाई तळजाई टेकडी जवळ करण्यात आली.या दोघांना मोक्काच्या गुन्ह्यात फरार असणाऱ्या गुन्हेगाराने पिस्तुल विक्री करण्यासाठी दिल्याचे समोर आले आहे.

योगेश गणेश बोरगे (वय २, रा. धनकवडी) व ऋषिकेश राजाभाऊ गरुड (वय २२, रां. पद्मावती, सहकारनगर) असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार,शहरात गुन्हेगारी टोळी तसेच गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगाराबाबत माहिती ठेवण्याचे सूचना देण्यात आल्या आहेत. यादरम्यान युनिट एकचे कर्मचारी सचिन जाधव यांना बतमीदारामार्फत माहिती मिळाली की, दोन तरुण तळजाई टेकडीजवळ पिस्तुल घेऊन थांबले आहेत. यानंतर याची माहिती काढण्यात आली. यानंतर पथकाने याठिकाणी सापळा रचून त्याला पकडले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याजवळ दोन पिस्तुल व दोन जिवंत काडतुसे जप्त केली. त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर त्यांना पिंपरी चिंचवड पोलिसांनी मोक्कानुसार कारवाई केलेल्या एका टोळीचा सदस्य फरार आहे. त्या गुन्हेगाराने या दोघांना पिस्तुल दिल्याचे समोर आले आहे.

या दोन्ही आरोपींविरुद्ध सहकारनगर पोलिस ठाण्यात आर्म ॲक्ट कलम 3(25) मपोका 37(१)135 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. तसेच पुढील कारवाईसाठी दोन्ही आरोपींना सहकारनगर पोलिसांचा ताब्यात देण्यात आले.

ही कामगिरी गुन्हे शाखा युनिट एकचे पोलिस उपनिरीक्षक सुनील कुलकर्णी, पोलीस अंमलदार सचिन जाधव, दत्ता सोनवणे, प्रशांत गायकवाड, इम्रान शेख, महेश बामगुडे, अशोक माने, शशीकांत दरेकर, सतिश भालेकर, जितुसिंग वसावे यांच्या पथकाने केली

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.