महाराष्ट्रात लॉकडाउन लागणार का? राजेश टोपे म्हणतात..

मुंबई : राज्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्ण संख्या रोज १० हजारांच्या पुढे येत आहे. त्यामुळे पुन्हा लॉकडाऊन लागणार का याची सध्या धास्ती लोकांच्या मनात आहे. औरंगाबाद, नागपूर, अमरावतीसह काही शहरांमध्ये अंशत: लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा लॉकडाउन लागणार का अशी चर्चा सुरू आहे. पण, राज्यात पुन्हा लॉकडाउन लागणार नाही, कडक निर्बंध लावले जातील, असं राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं.मुंबईमध्ये पत्रकारांशी बोलत असताना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोरोना परिस्थिती आणि लसीकरणाबद्दल महत्त्वाची माहिती दिली आहे.

राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. ही चिंतेची बाब असून कोविड नियंत्रण उपयोजना सुरू आहे. राज्यात लवकरच कडक निर्बंध लावले जाणार आहे. लॉकडाऊन न करता कडक निर्बंध आणणार आहे. राज्य सरकार लवकरच नवीन नियामवली जाहीर करणार आहे’ अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. गर्दी नियंत्रित करण्यासाठी विविध उपाय योजनावर चर्चा सुरू आहे, कोविड संदर्भात केंद्र सरकारने राज्य सरकारला सूचना दिल्या आहेत. अमित शहा यांनी ही वाढत्या कोरोना रुग्णसंख्येसंदर्भात सूचना दिल्या आहेत. राज्य सरकार म्हणून आम्ही त्या सूचनांचे पालन करत आहोत, असंही टोपे म्हणाले आहेत.

कॉन्टॅक्ट ट्रेंस करणे हे राज्य सरकार पुढे आव्हान आहे. कुठेही बेड कमी नाहीत. खाजगी ठिकाणी एखाद्या हॉस्पिटलमध्ये अडचण असेल. राज्यात ८५ टक्के ए सिमटोमॅटिक रुग्ण आहेत. रोज ३ लाख लसीकरणाचे लक्ष आहे. लसीकरणासाठी १०० बेड च्या रुग्णालयाची अट शिथिल करून ५० किंवा २५ करावी अशी मागणी आम्ही केंद्राकडे केली आहे, असंही टोपे यांनी सांगितले. ‘माझ्या सर्व पक्षीय सहकाऱ्यांना आवाहन आहे की मंत्रालयात आणि शासकीय कार्यालयात भाऊगर्दी करू नये. अति महत्वाचं काम असेल तरच या, असं आवाहनही टोपे यांनी केलं आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.