जेवणाच्या वादातून हॉटेल चालकावर कोयत्याने वार करत खुनी हल्ला
पिंपरी चिंचवड : हॉटेलमध्ये जेवणासाठी गेलेल्या ग्राहकांनी हॉटेल मालकासोबत वाद घातला. त्यानंतर ग्राहकांनी त्यांच्या साथीदारांना आणून हॉटेल व्यावसायिक तरुणावर खुनी हल्ला केला. ही घटना
मंगळवारी (दि. 16) रात्री पिंपळे निलख येथे घडली. या प्रकरणी पाच जणांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला असून, तिघांना अटक केली आहे
अमोल धुमाळ, अंबादास पासलकर, अक्षय राक्षे, अभि मोरे, राजू फडतरे (सर्व रा. पिंपळे निलख) आणि सात ते आठ अनोळखी व्यक्तिंविरोधात सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. धुमाळ, राक्षे आणि मोरे या तिघांना अटक केली आहे.
अक्षय अशोक चव्हाण (वय 25, रा. पाखरे हाईट्स, बाणेर) असे खूनी हल्ला झालेल्या हॉटेल व्यावसायिक तरुणाचे नाव आहे. याबाबत त्यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी 16 मार्च रोजी रात्री सव्वादहाच्या सुमारास पिंपळे निलख बाणेर रस्त्यावरील हॉटेल विसावा येथे जेवण करण्यासाठी गेले होते. त्यावेळी जेवण देण्यावरून फिर्यादी आणि आरोपींमध्ये शाब्दिक चकमक उडाली. आरोपी आपल्या समवेत आणखी काही जणांना घेऊन आले. आरोपींनी फिर्यादी यांना शिवीगाळ करीत हाताने मारहाण केली. दगड फेकून मारले. पासलकर त्याने माझ्या पोरांना जेवण देत नाही तुला माज आलाय का? मी इथला भाई आहे असे म्हणत कोयत्याने डोक्यात दोन वार केले. त्यात फिर्यादी जखमी झाले. या प्रकरणी पोलीसांनी पाच जणांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करत तिघांना अटक केली आहे. सांगवी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!