भाजीचा व्यवसाय करण्याचे आमिष दाखवत एका व्यावसायिकासह शेतकऱ्यांला लाखोंचा गंडा

पुणे : लॉकडाऊनच्या काळात भाजीचा व्यवसाय करण्याचे आमिष दाखवत एका व्यावसायिकासह शेतकऱ्यांला 84 लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार पुण्यात समोर आला आहे. याप्रकरणी  भारती विद्यापीठ पोलिसांनी आरोपीला अटक केले. ही घटना ऑगस्ट 2020 ते जानेवारी 2021 आंबेगाव बुद्रूकमध्ये घडली.

आाशिष अरूण अरणकल्ले (वय 32, रा. आंबेगाव ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी अविनाश पासलकर (वय 34, रा. आंबेगाव ) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा बांधकाम साईडला लागणारे साहित्य पुरविण्याचा व्यवसाय आहे. दरम्यान त्यांची व आरोपीची एकमेकांच्या ओळखीचे आहेत.गेल्या वर्षी कोरोनाचा संसर्ग वाढल्याने मार्च महिन्यात लॉकडाऊन झाले होते. सर्व व्यवहार ठप्प होते. पण अत्यावश्यक सेवा म्हणून, दूध, भाजीपाला आणि किराणा हा व्यवसाय सुरू होता.

दरम्यान आरोपी आशिष याने देखील फिर्यादी यांना आपण भागीदारीत भाजी विक्रीचा व्यवसाय करू, ज्यातुन मोठा नफा होईल असे आमिष दाखवले. त्यांना दिवसाला हजारो रुपये मिळतील याची आकडेबेरीज करून दाखवली. त्यांच्यासोबत इतर देखील दोघांना अश्याच प्रकारे भुरळ घातली. फिर्यादी यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. प्रथम काही पैसे दिले. यावेळी आरोपीने त्यांना परतावा म्हणून काही पैसे दिले. यामुळे फिर्यादी यांचा विश्वास बसला. यानंतर त्यांनी वेळोवेळी एकूण 87 लाख रुपये दिले. त्यातील केवळ 3 लाख रुपये परत करत त्यांचे 84 लाख रुपये परत केले नाही. तर त्यांच्यासोबत इतर दोघांनी देखील पैसे दिले आहेत. त्यांचेही पैसे परत केले नसल्याच्या तक्रारी आल्या आहेत. त्याने अनेक शेतकऱ्यांकडून कांदे तसेच इतर भाजीपाला घेऊन त्यांचेही पैसे न देता फसवणूक केली आहे. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे. पोलिस अधिक तपास करत आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.