घरफोड्या करुन धुमाकूळ घालणाऱ्या 14-12 के आर गॅंग पिंपरी चिंचवड पोलिसांच्या जाळ्यात
पिंपरी चिंचवड : पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहर व ग्रामीण परिसरात घरफोड्या करुन धुमाकूळ घालणाऱ्या 14-12 के आर गॅंगच्या चार जणांना पिंपरी चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे.. 14-12 के आर गॅंग कर्नाटक राज्यात पळून जाण्याचा प्रयत्नात होती. त्यावेळी पोलिसांनी के आर गॅंगला अटक केली आहे.त्यांच्याकडून एकूण १० लाख ३९ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. यात, २० तोळे सोन्याचे आणि २० तोळे चांदीच्या दागिन्यांचा समावेश आहे
के आर गँगचा म्होरक्या किरण राठोड तसेच के आर गॅंगचे सदस्य भगतसिंग भादा, करण राठोड आणि अभिषेक नलावडे यांना पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे. किरण राठोडने आपल्या नावाच्या पहिल्या अक्षरावरून स्वतःच्या टोळीला के आर गॅंग असं नाव दिलं होतं. तसेच पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरात आपल्या गँगची दहशत निर्माण व्हावी म्हणून के आर गँगने स्वतःच्या गॅंगला पिंपरी चिंचवडचा RTO पासिंग नंबर 14-12 के आर गॅंग असं नाव दिलं.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, के आर गँगचा म्होरक्या आणि तसेच के आर गॅंगचे सदस्य यांनी दिघी परिसरात दहशत पसरवत चिकनच्या दुकानात बळजबरी करत दुकान मालकाच्या गळ्याला कोयता लावून गल्ल्यातील पैसे घेऊन, ‘मी भोसरीचा दादा आहे माझं नाव किरण राठोड आहे मला कोणी नाडायच नाही,’ असं रोडवर मोठमोठ्याने ओरडून दहशत पसरवली होती. याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार भोसरी पोलीस आरोपींचा शोध घेत होते. दरम्यान, आरोपी हे कर्नाटकला पळून जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर कैलासे यांच्या पथकातील गणेश सावंत आणि समीर रासकर यांनी डोंगराळ भागातून सापळा रचून आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या. त्याच्याकडून आठ तोळे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम हस्तगत करण्यात आली.
तर, दुसऱ्या कारवाईमध्ये पोलीस उपनिरीक्षक महेंद्र गाढवे यांच्या मार्गदर्शनाखाली विधाते आणि गोपी यांच्या पथकाने घरफोडीमधील अट्टल गुन्हेगार जयड्याला बेड्या ठोकल्या आहेत. त्याने आत्तापर्यंत ८७ घरफोड्या केल्या असून सोने आणि चांदीचा सहा लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. जयड्या हा घरफोडी करून पसार होत असताना सीसीटीव्हीत कैद झाल्याने तो स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाला होता. तो सचिन पवारच्या साथीने घरफोड्या करायचा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे आणि जितेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!