पुण्यात पोलीस कर्मचाऱ्याच्या डोक्यात फोडली बिअरची बाटली

पुणेः रस्त्यावर सुरू असलेले भांडण सोडविण्यासासाठी गेलेल्या पोलिस कर्मचाऱ्याच्या डोक्यात बिअरची बाटली फोडत मारहाण केल्याची घटना हडपसर परिसरात घडली आहे.याप्रकरणी  दोन जणांच्या विरोधातnहडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ओमकार उर्फ बंटी काकडे आणि अश्विन उर्फ भाऊ पडघमकर असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.याप्रकरणी पोलिस शिपाई रवी राठोड यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (ता. 17) रात्री अकरा वाजता फिर्यादी रवी राठोड हे ड्युटी संपल्यानंतर घरी जात होते. त्यावेळी एका दारू दुकानाजवळ तिघेजण एकासोबत भांडण करीत होते. दुकान बंद झालेले असतानाही आरोपी दुकानाला दारू देण्यावरून वाद घालत होते. त्यामुळे रवी राठोड यांनी त्यांना समजून सांगितले. त्याचा राग आल्यामुळे आरोपी ओमकार काकडे याने त्यांना शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. त्यानंतर रवी राठोड यांच्या डोक्यात बियरची बाटली फोडून त्यांना जखमी केले. हडपसर पोलिस पुढील तपास करत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.