बिबट्याच्या कातड्याची तस्करी करण्यासाठी आलेल्या दोघांना अटक, शिक्रापूर पोलिसांची मोठी कारवाई

शिक्रापूर : बिबट्याच्या कातड्याची तस्करी करण्यासाठी आलेल्या दोघांना शिक्रापूर पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून वाघाचे कातडे आणि दुचाकी जप्त केली आहे. ही कारवाई शिक्रापूर तळेगाव ढमढेरे रोड येथे करण्यात आली.

लगत दोन इसम बिबट्याच्या कातड्याची तस्करी करण्यासाठी येणार असल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांना मिळाली असता शिक्रापूर पोलिसांच्या पथकाने कारवाई करत दोघा युवकांना वाघाचे कातडे आणि दुचाकीसह जेरबंद केले असल्याची घटना घडली असून दत्तात्रय देवराम शिंदे व दादासाहेब रामदास थोरात असे अटक करण्यात आलेल्या इसमांची नावे आहेत.

दत्तात्रय देवराम शिंदे (वय ३० वर्षे रा. पळवे ता. पारनेर जि. अहमदनगर) व दादासाहेब रामदास थोरात (वय ३४ वर्षे रा. वाळवणे ता. पारनेर जि. अहमदनगर सध्या रा. शिरूर ता. शिरूर जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार,शिरूर येथील शिक्रापूर तळेगाव ढमढेरे रोड लगत त्रिमूर्ती गार्डन मंगल कार्यालय जवळ काही युवक बिबट्याच्या कातड्याची विक्री करत तस्करी करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.त्यानुसार पोलिसांनी त्या ठिकाणी सापळा लावला असता त्या ठिकाणी दोन संशयित युवक दुचाकीहून आले असल्याचे सदर पोलीस पथकाला दिसून आले.

 

त्यावेळी पोलिसांच्या पथकाने त्या युवकांच्या जवळील असलेल्या पिशवीची पाहणी केली असता त्यामध्ये काळे टिपले असलेले बिबट्याचे कातडे मिळून आले, यावेळी पोलिसांनी त्या युवकांना ताब्यात घेत त्यांच्या कडून अंदाजे दहा लाख रुपये किमतीचे बिबट्याचे कातडे जप्त केले असून शिक्रापूर पोलिसांनी दत्तात्रय व दादासाहेब  या दोघांवर वन्य जीव अधिनियमन अंतर्गत गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक उमेश तावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम साळुंके हे करत आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.