भरदिवसा घरफोडी करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला दत्तवाडी पोलिसांकडून अटक

पुणे : पुणे शहरातील मित्रमंडळ कॉलनीत भरदिवसा घरफोडी करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला दत्तवाडी पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून 9 लाख 50 हजारांचे दागिने जप्त करण्यात आले असून तीन गुन्हे उघडकीस आले आहेत. चोरीचे दागिने खरेदी करणाऱ्या सराफालाही पोलिसांनी नगरमधून अटक केली.

मुकेश बबन मुने उर्फ मुन्ना (वय 24, रा. सुतारदरा कोथरूड) असे सराईत घरफोड्याचे नाव आहे. तर राजन सुधाकर मिसाळ (वय 53, रा. नगर) असे सराफाचे नाव असून त्यांना अटक करण्यात आली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार,दत्तवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मित्रमंडळ कॉलनीतील एका घरातून भरदिवसा 8 लाखांच्या दागिन्यांची चोरी करण्यात आली होती. त्यानुसार पोलिसांनी तत्काळ तीन पथके तयार करून शोधमोहिम सुरू केली होती. गुन्ह्याचा तपास करीत असताना पोलीसांनी तब्बल 200 ते 250 सीसीटीव्हीचे फुटेज तपासून आरोपी मुन्नाचा माग काढला. तो चोरी केल्यापासून पनवेल, भोसरी, खोपोली, नगर, संभाजीनगर अशी वारंवार ठिकाणे बदलत होता. त्यामुळे पोलिसांसमोर तपासाला अडचणी निर्माण झाल्या होत्या.

त्यावेळी आरोपी सहकारनगर परिसरातील एका विहीरीजवळ थांबल्याची माहिती पोलीस अमंलदार अमित सुर्वे आणि राहूल ओलेकर यांना मिळाली.त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून मुन्नाला ताब्यात घेतले.चौकशीत त्याने घरफोडीची कबुली दिली आहे. चोरी केलेले दागिने त्याने नगरमधील सराफ राजन मिसाळला विकल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी त्यालाही अटक केले आहे. आरोपी मुन्ना अट्टल घरफोड्या असून त्याच्याविरूद्ध विविध पोलीस ठाण्यात तब्बल 49 गुन्हे दाखल आहेत.

ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णा इंदलकर, पोलीस निरीक्षक विजय खोमणे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील लोहार, वुंâदन श्ािंदे, सुधीर घोटकुले, राजू जाधव, अमित सुर्वे, राहूल ओलेकर, शरद राउत, शिवाजी क्षीरसागर, महेश गाढवे, नवनाथ भोसले, विष्णू सुतार, अक्षयकुमार वाबळे, प्रमोद भोसले यांच्या पथकाने केली.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.