‘माझ्यासोबत लग्न केले नाही तर मी जीव देईल आणि तुम्हाला केसमध्ये अडकवेन असे म्हणत…

पिंपरी चिंचवड : लग्नास नकार दिल्यानंतर ‘माझ्यासोबत लग्न केले नाही तर मी जीव देईल आणि तुम्हाला केसमध्ये अडकवेन’ अशी धमकी तरुणाने तरुणीला दिली. तसेच तरुणीच्या नियोजित सासरच्या लोकांना तिचे फोटो आणि मेसेज पाठवून लग्न मोडण्याचा प्रयत्न केला. याबाबत तरुणाच्या विरोधात गुन्हा दाखल करत पोलिसांनी तरुणाला अटक केली आहे.हा प्रकार सन 2014 पासून 18 मार्च 2021 याकालावधीत बळीराज कॉलनी,नखाते चौक, रहाटणी येथे घडला आहे.

नागेश किशनराव टंगाटूरे (वय 30, रा. हडपसर, पुणे) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत पीडित तरुणीने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नागेश याने ‘मला तू आवडतेस, माझे तुझ्यावर प्रेम आहे. माझ्यासोबत लग्न करशील का’ असे वारंवार विचारून तरुणीला त्रास दिला. तरुणीने आणि तिच्या घरच्यांनी नागेशला लग्नास नकार दिला. त्यानंतर त्याने माझ्यासोबत लग्न केले नाही तर मी माझा जीव देईल व तुम्हाला केसमध्ये अडकवेन. मी जीव देणार व त्याला तुम्ही सर्वजण जबाबदार राहणार’ अशा धमकीचे मेसेज पाठवले. तरुणीच्या नियोजित सासरच्या नातेवाईकांना देखील.तरुणीचे फोटो आणि मेसेज पाठवून तिचे लग्न.मोडण्याचा प्रयत्न केला. नियोजित सासरच्या नातेवाईकांना देखील आरोपीने बघून घेण्याची धमकी.दिली. याबाबत गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.