चक्क स्मशानभूमीतले दहन स्टॅन्ड गेले चोरीला, कामशेत सातेमधील प्रकार
कामशेत : साते येथील स्मशानभूमीमधील मृतदेह दहन स्टँड चोरीला गेल्याचा अजब प्रकार येथे घडला आहे. या संदर्भात जांभूळ व ब्राम्हणवाडी येथील ग्रामसेवक राजकुमार सोनटक्के यांनी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे.
स्मशानभूमीतील दिवे देखील चोरीला गेले आहेत. मृतदेह दहन स्टँड नसल्याने मृतदेहाचे दहन करताना रचलेले सरण कित्येक वेळा कोसळून अवयव अपूर्ण जळल्याचे प्रकार येथे घडत आहेत.
ब्राम्हणवाडी येथील दोन व जांभूळ येथील दोन असे एकूण चार मृतदेह दहन स्टॅन्ड चोरीला गेले आहेत. स्मशानभूमीत केवळ अंत्यसंस्कार, सावडणे व दशक्रिया आदी विधीला गर्दी असते.
इतरवेळी स्मशानभूमीमध्ये कोणीही वावरताना दिसत नाही. चोरटे बिनधास्त पणे स्मशानभूमीतील मृतदेह दहन स्टँड व हायमॅक्स दिवे चोरून नेले आहेत. चोरटे स्मशानभूमीत डल्ला मारत असल्याने ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!