इंदापुरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा,२ लाख ३१ हजार ७५० रू.किंमतीचा मुद्देमाल जप्त
इंदापुर; इंदापुर शहर,बाबा चौक परीसरात ६ जणांची टोळी संगनमताने १५१ पॉइंटची रम्मी नावाचा जुगार खेळत व खेळवीत असतांना.इंदापुर पोलिसांनी छापा टाकत एकुण २ लाख ३१ हजार ७५० रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करून आरोपींवर गुन्हा दखल केला आहे.
लक्ष्मण दुर्गाण्णा जाधव,(वय ३०, रा.बाबा चौक इंदापुर, जि.पुणे), अजय संजय चव्हाण,(वय २८, कालठण नं.१ इंदापुर, जि.पुणे), नवशाद मुहम्मद मुलाणी(वय ३३ वर्षे, आगोती नं.२ इंदापुर, जि.पुणे), नवनाथ सुभाष चव्हाण, (वय ३० इंदारपुर, जि.पुणे), बंडु बाबुराव क्षेत्री, (वय ५२ वर्षे, आगोती नं.२ इंदापुर जि.पुणे), नितीन दत्तात्रय पांढरे (वय ३६ वर्षे, सरस्वती नगर इंदापुर, जि.पुणे) अशी गुन्हा दखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि.१७ मार्च रोजी इंदापुर शहर,बाबा चौक परीसरात ६ जणांची टोळी संगनमताने १५१ पॉइंटची रम्मी नावाचे जुगार खेळत व खेळवीत असतांना पोलिसांनी छापा टाकून ३ हजार ६५०/-रूपये रोख रक्कम,एक हिरो होन्डा पॅशन एलस कंपनीची मोटारसायकल नं. एल८१९३-६० हजार/- किंमतीची,हिरो होन्डा कंपनीची प्लेजर मोटारसायकल नं.एम.एच. ५७७६ -५० हजार/-रू.किंमतीची,होन्डा शाईन कंपनीची मोटारसायकल नं.एम.एच.४२ ए.जे. ६७०३-७० हजार/-रू. किंमतीची,एम सँमसंग कंपनीचा duos निळया रंगाचा मोबाईल १ हजार १००/-रू किमतीचा,एक काळया रंगाचा आयटेल कंपनीचा मोबाईल,दोन सॅमसंग कंपनीचे १६ हजार/-रू किंमतीचा मोबाईल,१ सॅमसंग कंपनीचा नोट ९-३० हजार/-रू किमतीचा मोबाईल असा एकूण २ लाख ३१ हजार ७५०/-रू किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन आरोपींवर गुन्हा दखल केला आहे.
सदरची कारवाई मपोसई / मुंढे यांनी केली आहे.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!