दहावी आणि बारावीची परीक्षा ऑफलाईनच, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची मोठी घोषणा

मुंबई : दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्वाची बातमी आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी परीक्षा ऑफलाईन (लेखी परीक्षा) पद्धतीनुसार होणार आहे, अशी महत्वाची माहिती दिली आहे. बोर्डाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षा 29 एप्रिल ते 21 मे दरम्यान आणि इयत्ता बारावीच्या परीक्षा 23 एप्रिल ते 20 मे या नियोजित तारखेनुसारच होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षेच्या वेळेतही महत्वाचे बदल करण्यात आले असून बोर्डाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षा 29 एप्रिल ते 21 मे दरम्यान आणि इयत्ता बारावीच्या परीक्षा 23 एप्रिल ते 20 मे या नियोजित वेळापत्रकानुसार ऑफलाईनच होणार असल्याची बातमी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाडांनी दिली आहे. या काळात परीक्षा या सकाळी 11 ऐवजी साडे 10 वाजता सुरू होणार असल्याचंही स्पष्ट झालंय.

ऑनलाइन परीक्षा घेण्याबाबत खूप विचार केला गेला पण दुर्गम भागात ऑनलाइन परीक्षा घेणे कठीण आहे असं शिक्षणमंत्री वर्षा गायकवाडांनी स्पष्ट केलं. 80 मार्कच्या पेपरसाठी साडे तीन तास वेळ मिळणार आहे, म्हणजे पेपर सकाळी साडे 10 वाजता सुरू होणार असून ती दुपारी 2 वाजेपर्यत असेल. 40 आणि 60 गुणांच्या पेपरसाठी 15 मिनिटे वाढ मिळणार आहे. दिव्यांगांसाठी सगळ्या पेपरना अतिरिक्त एक तासाची वाढीव वेळ देण्यात येणार आहे. तर प्रॅक्टिकलच्या परीक्षा गृहपाठ पद्धतीने होणार आहेत. राज्यात दहावीसाठी सुमारे 17 लाख विद्यार्थी तर बारावीसाठी सुमारे 13 लाख विद्यार्थी बसले आहेत.

 

एखाद्या विद्यार्थ्यांस परीक्षा कालावधीमध्ये कोरोनाची काही लक्षणे जाणवत असल्यास अथवा कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे अथवा लॉकडाऊन, कन्टेनमेंट झोन, संचारबंदी अभावी परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष परीक्षेचे आयोजन जून महिन्यामध्ये करण्यात येईल.

 

परीक्षा मंडळामार्फत आयोजित केली जाणारी पुरवणी परीक्षा जुलै- ऑगस्ट मध्ये घेण्यात येईल. सदरची परीक्षा केंद्रे शहरी भागात ठराविक ठिकाणी व ग्रामीण भागात तालुक्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी निश्चित करण्यात येतील.

परीक्षेसंदर्भात शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, केंद्र प्रमुख पर्यवेक्षक व अन्य बाबी साठी स्वतंत्र सूचना देण्यात येतील. कोविड-19 बाबत केंद्रशासन व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचना स्वतंत्रपणे देण्यात येतील. राज्यमंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरीलच माहिती अधिकृत समजण्यात यावी असं आवाहन सर्व विद्यार्थ्यांना, पालकांना करण्यात आलं आहे.

प्रॅक्टिक्ल परीक्षा यंदा असाईनमेंट पद्धतीने

दहावीच्या प्रॅक्टिक्ल परीक्षा यंदा विशिष्ट लेखन कार्य (असाईनमेंट)  पद्धतीने घेतल्या जाणार आहे. विशेष म्हणजे हे असाईनमेंट लेखी परीक्षा संपल्यानंतर शाळेत गृहपाठ पद्धतीने द्यायचे आहेत. हे असाईनमेंट 21 मे ते 10 जूनपर्यंत शाळेत द्यायचे आहे. तर बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा या 22 मे ते 10 जून यामध्ये होतील. कला, वाणिज्य, व्यावसायिक अभ्यासक्रम शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी लेखी परीक्षेनंतर 15 दिवसात असाईनमेंट सादर करायचे आहेत.

मात्र 12 वी विज्ञान शाखेच्या प्रात्याक्षिकांची संख्यादेखील कमी करण्यात आली आहे. कला, वाणिज्य आणि व्यावसायिक अभ्यासक्रम शिकत असलेल्या बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेनंतर 15 दिवसांमध्ये असाईनमेंट सादर करावी लागणार आहेत.

सुरक्षात्मक उपाय योजना 

दहावीच्या दरवर्षी प्रात्यक्षिक परीक्षा घेतल्या जात असत परंतु या वर्षी कोविड -19 परिस्थितीमुळे विशिष्ट लेखन कार्य गृहपाठ पध्दतीने घेण्यात येतील. प्रात्यक्षिक परीक्षा ऐवजी विशिष्ट लेखनकार्य, गृहपाठ पध्दतीने 21 मे ते 10 जून या कालावधीत सादर करण्यात यावेत असं बोर्डाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

 

बारावीच्या लेखी परीक्षेनंतर प्रात्यक्षिक परीक्षा या 22 मे ते 10 जून या कालावधीत होतील. कोविड-19 च्या परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शाळेमध्ये प्रात्यक्षिकांचा सराव कमी असल्यामुळे 12 वी च्या सायन्सच्या विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिके कमी करण्यात आली असून 5 ते 6 प्रात्यक्षिकावरच परीक्षा घेण्यात येईल व त्या संदर्भात माहिती कनिष्ठ महाविद्यालयांना स्वतंत्रपणे देण्यात येईल. कला, वाणिज्य, व्यावसायिक अभ्यासक्रम शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी लेखी परिक्षेनंतर 15 दिवसात Assignment सादर करावेत.

 

दहावी आणि बारावी मधील विद्यार्थ्यांस अथवा त्याच्या कुटुंबातील सदस्यास प्रात्यक्षिक परीक्षा कालावधी मध्ये कोरोनाची लागण झाल्यास किंवा लॉकडाऊन, कन्टेमेंन्ट झोन, संचारबंदी अथवा कोरोना विषय परिस्थितीमुळे, प्रात्यक्षिक परीक्षा किंवा Assignment सादर करण्यासा 15 दिवसाची मुदतवाढ देण्यात येईल असं बोर्डाने आपल्या निवेदनात सांगितलं आहे.

परीक्षेसाठी यंदा वाढीव वेळ

दरवर्षी ८० गुणांच्या लेखी परीक्षेसाठी तास वेळ दिला जात असे. परंतु यावर्षी विद्यार्थ्यांचा लेखनाचा  सराव कमी झाल्यामुळे लेखी परीक्षेसाठी ३० मिनिटे वेळ वाढवून देण्यात आला आहे. तर ४० आणि ५० गुणांच्या परीक्षेसाठी १५ मिनिटे वेळ वाढवून देण्यात आला आहे. परीक्षार्थी दिव्यांग विद्यार्थ्यांना सर्वसामान्य विद्यार्थ्यांपेक्षा परीक्षेसाठी प्रत्येकी घड्याळी तासासाठी २० मिनिटांची वेळ वाढवून देण्यात येईल.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.