बांधकाम व्यावसायिकाकडून पीएमआरडीएच्या आदेशाला केराची टोपली ; आदेशाचे उल्लंघन करून काम सुरूच असल्याचा तक्रारदाराचा आरोप

वाघोली (प्रतिनिधी) :वाघोली येथील डिफेन्स कॉलनी सहकारी गृहरचना संस्थेच्या बांधकाम व्यावसायिक रस्ता उपलब्धतेबाबत कागदपत्र सादर करू शकला नसल्यामुळे पीएमआडीएकडून संबधित बांधकाम व्यावसायिकास बांधकाम काम थांबवावे असे आदेश देण्यात आले. परंतु बांधकाम व्यासायीकाकडून पीएमआरडीएच्या आदेशाला केराची टोपली दाखवत बांधकाम सुरूच ठेवले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या संबधित बांधकाम व्यावसायिकावर कडक कारवाई करावी अशी लेखी तक्रार स्थानिक रहिवाशी हरीश्चंद्र सातव यांनी पीएमआरडीएकडे केली आहे.

याबाबत माहिती अशी की, वाघोली-भावडी रस्त्यालगत असणाऱ्या डिफेन्स कॉलनी फेज ४ साठी पोहच रस्त्याच्या वादातून पीएमआरडीए कार्यालयात हरिश्चंद्र पांडुरंग सातव यांनी डिफेन्स कॉलनी फेज ४ तर्फे नारायण प्रभाकर अंकुशे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. यानुसार पोहच रस्त्याचे स्थान निश्चित करण्यासाठी पीएमआरडीएने ८ जानेवारी रोजी वादांकित गट नंबर ६३ व लगतचे गट नंबर १, ५८, ५९ यांची संयुक्त मोजणी करून मोजणी नकाशा सादर करण्याचे लेखी आदेश देण्यात आले होते. तसेच या मिळकतीमध्ये त्रयस्त हितसंबंध होणार नाही असे आदेशात नमूद करण्यात आले होते. मात्र सदर मिळकतीमध्ये त्रयस्त हितसंबंध निर्माण करून करारनामे केल्याचे आढळून आल्याने या जागेवरील बांधकाम थांबविण्याचे आदेश पीएमआरडीएचे दिले होते.

रस्ता उपलब्धतेबाबत कागदपत्र सादर करण्यासाठी काही कालावधी द्यावा अशी मागणी विकासकाने पीएमआरडीएकडे केली होती. परंतु बांधकाम व्यावसायिकाकडून रस्त्याबाबत सबळ कागदपत्रे नसल्यामुळे पीएमआरडीएने डिफेन्स कोळणीचे काम थांबावे असे आदेश दिले. तरीही विकासकाने पीएमआरडीएच्या आदेशाला न जुमानता काम सुरूच ठेवले. काम बंद करण्याचे आदेश असताना सुद्धा विकासकाकडून काम सुरु असल्याचे पुराव्यासह तक्रारदार सातव यांनी पीएमआरडीएकडे पुन्हा एकदा तक्रार दाखल केली. सातव यांच्या तक्रारीवरून दि. १३ मार्च रोजी पीएमआरडीएच्या संबधित अधिकाऱ्यांनी पंचनामा केला. यामध्ये डिफेन्स कॉलनीचे काम सुरु असल्याचे निदर्शनास आल्यामुळे काम थांबविण्याचे आदेश दिले. पीएमआरडीएनेकडून काम थांबविण्याबाबत आदेश सुद्धा असताना बांधकाम व्यावसायिकाने आदेशाला केराची टोपली दाखवून काम सुरूच ठेवले असल्याचा आरोप सातव यांनी केला आहे. संबधित विकासकावर कारवाई करावी अशी मागणी वाघोलीतील स्थानिक हरिश्चंद्र सातव यांनी केली आहे.

पीएमआरडीएच्या संबधित अधिकाऱ्यांना संपर्क केला असता होऊ शकला नाही.

प्रतिक्रिया

देशाची सेवा करणाऱ्या आजी-माजी सैनिकांना स्वतःचे घरकुल मिळावे या उदात्त हेतूने ही डिफेन्स कॉलनी उभारण्यात येत आहे. या कॉलनीच्या बांधकामाबाबत तक्रारदाराच्या तक्रारीवरून पीएमआरडीए काम थांबवण्याचे सांगितले आहे. त्यानुसार काम थांबविण्यात आले आहे. – नारायण अंकुशे (डिफेन्स कॉलनी स.गृ.सं)

 

संबधित बांधकाम व्यावसायिक डिफेन्स कॉलनीसाठी रस्ता उपलब्धतेबाबत कागदपत्रांची पूर्तता करू शकत नसल्यामुळे बांधकामाची मंजुरी काढण्यात यावी जेणेकरून फ्लटधारकांची फसवणूक होणार नाही. – हरिश्चंद्र सातव (तक्रारदार)

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.