माहेरहून दागिने, पैसे आणण्यासाठी विवाहितेचा छळ, सासरच्या पाच जणांवर गुन्हा दाखल

पिंपरी चिंचवड : माहेरहून दागिने, पैसे आणण्यासाठी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पतीसह सासरच्या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी (दि.19) ताजने मळा, चहोली याठिकाणी हा प्रकार उघडकीस आला.

पती सुधीर सतिश गायकवाड, सासुरंजना सतिश गायकवाड, दिर समीर सतिश गायकवाड,जाऊ वैशाली समीर गायकवाड, नणंद प्रिती विल्सन साळवे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीची नावे आहेत. याप्रकरणी पीडित महिलेने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,आरोपींनी फिर्यादी महिलेला स्वयंपाक येत नाही, फिर्यादी यांनी जॉब करावा तसेच माहेरहून दागिने, पैसे आणण्यासाठी मानसिक व शारीरिक छळ केला. तसेच, दिर व जाऊ यांनी उलट सुलट माहिती देऊन भांडणं लावली. त्यामुळे फिर्यादीस खुप मानसिक त्रास झाला आहे,असे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास एस. एम. भदाणे करीत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.