होमक्वारंटाईन व्यक्ती बाहेर फिरल्यास कारवाई – पो. नि. निरीक्षक प्रताप मानकर

वाघोली प्रतिनिधी: होमक्वारंटाईन असणारे नागरीक यांनी सुरक्षीत घरात राहणे गरजेचे असून कोणीही विनाकारण बाहेर फिरता येणार नाही. जर कोणीही होमक्वारंटाईन व्यक्ती पोलीस तपासणी वेळी घरी मिळुन न आल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारावाई करण्यात येईल असा इशारा पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांनी दिला आहे.

लोणीकंद पोलीस स्टेशन हददीत वाढत्या कोरोना रुग्णांच्या अनुषंगाने १ जानेवारी पासुन आज पर्यंत विना मास्क फिरणाऱ्या २५३६ जणांवर कारवाई करून ३ लाख ४० हजार ४०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच ३२ हॉटेल व इतर आस्थापनांवर कारवाई करून ८० हजारांचा दंड वसुल करण्यात आला आहे. ९ जणांवर गुन्हे दाखल करून सी.आर.पी.सी.१४९ प्रमाणे ६० मंगल कार्यालय व हॉटेल व्यवसायीकांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.

वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता सोसायटी मधील क्लब हाऊस हे बंद ठेवण्यात आलेले आहे. लग्न समारंभासाठी ५० लोकांना परवानगी राहील. सर्व जनतेने पायी चालत असो वा गाडीवर असताना सार्वजनिक ठिकाणी मास्क लावणे, सेनिटायजरचा वापर करणे व सोशल डिस्टनसचे पालन करणे गरजेचे आहे अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे नागरिकांनी शासकीय नियमांचे पालन करावे असे आवाहन लोणीकंद पोलिसांकडून करण्यात आले आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.