गृहमंत्री देशमुख यांच्यावर झालेल्या खंडणीच्या आरोपावर जयंत पाटीलाची प्रतिक्रिया..

मुंबई: गृहमंत्री अनिल देशमुख यांनी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना १०० कोटी रुपयांच्या वसुलीचं टार्गेट दिलं होतं, असा खळबळजनक दावा परमबीर सिंग यांनी काल (२० मार्च) केला. मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात सिंग यांनी हा दावा केल्यानंतर या लेटर बॉम्बमुळे राज्यभर खळबळ उडाली आहे. या पत्रानंतर अनिल देशमुख यांनीही एक पत्रक काढलं आणि आपली बाजू मांडली. आरोप सिद्ध करावेत अन्यथा परम बीर सिंग यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचं गृहमंत्र्यांनी म्हटलं आहे. यावर आता  राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष मंत्री जयंत पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

महाविकास आघाडी सरकरने कठोर भूमिका घेतल्यामुळे त्यांची ही प्रतिक्रिया आली असेल अशी प्रतिक्रिया राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील दिली आहे. त्यांनी मुंबईचे माजी पोलीस महासंचालक परमबीर सिंग याचं नाव न घेता, ही प्रतिक्रिया दिलीये. तसंच ट्विट करुन जयंत पाटील म्हणाले की, उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर गाडी कोणी ठेवली, त्यात जिलेटीनच्या कांड्या कोणी ठेवल्या, मनसुख हिरेन प्रकरणात काय घडलं हे राज्याच्या जनतेसमोर आणणे सध्या महाविकास आघाडी सरकारचे प्राधान्य आहे. त्यामुळे या प्रकरणावरून लक्ष विचलित होऊ नये याची काळजी घ्यावी.

 

 

जयंत पाटील यांनी आणखी एक ट्विट केलं आहे. ज्यात म्हटलं आहे की, राज्यातील सुरू असलेल्या घडामोडींवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख  यांनी कठोर भूमिका घेतली. या प्रकरणात जे कोणी अधिकारी दोषी आढळतील त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई केली जाईल अशी भूमिका महाविकास आघाडी सरकारने घेतल्याने त्याची प्रतिक्रिया आली असेल.

तसंच या परिस्थितीमध्ये सुद्धा सरकार खंबीर आहे. कोणतीही अडचण सरकारला येणार नाही. योग्य तो तपास केला जाईल, असंही जयंत पाटील सांगायला विसरले नाहीत.

तसंच या परिस्थितीमध्ये सुद्धा सरकार खंबीर आहे. कोणतीही अडचण सरकारला येणार नाही. योग्य तो तपास केला जाईल, असंही जयंत पाटील सांगायला विसरले नाहीत.

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.