घडामोडींना वेग ! शरद पवारांची दिल्लीत बोलावली तातडीची बैठक

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि सध्याचे होमगार्ड प्रमुख परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपांमुळे ठाकरे सरकार अडचणींमध्ये मोठी वाढ झाली आहे. परमबीरसिंग यांनी या पार्श्वभूमीवर थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार  यांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेतली असून दिल्लीत राष्ट्रवादीच्या महत्त्वाच्या मंत्र्यांची बैठक बोलावली आहे.

शरद पवार हे दिल्लीच्या  दौऱ्यावर आहे. परमबीर सिंग पत्रात गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहे. त्यामुळे शरद पवार यांनी दिल्लीतच राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे.

शरद पवारांनी दिल्लीत बोलावलेल्या या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे या बैठकीला उपस्थित असतील अशी माहिती मिळत आहे. परमबीरसिंग यांनी पत्र लिहून गृहमंत्री अनिल देशमुखांवर केलेल्या गंभीर आरोपानंतर पुढची रणनिती ठरवण्यासाठी ही बैठक असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, अनिल देशमुखांना गृहमंत्री पदावर हटविण्याबाबत देखील या बैठकीत चर्चा होण्याची दाट शक्यता आहे.

तसंच झालेल्याया प्रकारानंतर शरद पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासोबत दूरध्वनीवरून चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी पाठवलेल्या पत्रासंदर्भात दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहितीसमोर आली आहे.

माजी पोलीस आयुक्त यांनी गंभीर आरोप देशमुख यांच्यावर केले आहे. त्यानंतर राष्ट्रवादी पक्षाची भूमिका आणि पुढील भूमिका यावर शरद पवार आणि अनिल देशमुख यांच्यामध्ये चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.

गृहमंत्र्यांनी अनिल देशमुख यांनी शरद पवार यांना या प्रकरणा संदर्भात संपूर्ण माहिती दिली.  शरद पवार दिल्लीत असून आज दूरध्वनीवर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान, परमबीर सिंग यांच्या पत्रावर जयंत पाटील यांनी आपली भूमिका मांडत अनिल देशमुख यांनी बाजू घेतली.

मुंबई स्फोटकांनी भरलेली कार सापडली आणि त्यानंतर मनसुख हिरेन यांचा मृत्यू झालाय या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणा एनआयएकडे देण्यात आला आहे.  सध्याचा तपास ज्या पद्धतीने सुरू आहे तो योग्य पद्धतीने तपास चालू आहे. पण हा सगळा जो प्रकार आहे. त्यावरून लक्ष हटवण्याचा कुठेतरी विषय असल्याचे आजच्या परमवीर सिंगच्या पत्रावरून  जाणवतंय. पत्रात कुणाची सहानुभूती हे पत्र लिहले आहे. मुख्यमंत्री, गृहमंत्री यांनी कडक धोरण घेतल्यानंतर हे पत्र समोर आले. त्यामुळे या पत्राबाबत  अनेक शंका आहेत, असं वक्तव्य राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष मंत्री जयंत पाटील यांनी केलं.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.