घराच्या खिडकीचे गज कापून घरफोडी करणा-या टोळीचा पर्दाफाश, 12.78 लाखाचा मुद्देमाल जप्त
पिंपरी चिंचवड : घराच्या खिडकीचे गज कापून घरफोडी करणा-या टोळीचा पर्दाफाश करण्यात गुन्हे शाखा युनिट पाचच्या पथकाला यश आले. या पथकाने घरफोडीचे पाच गुन्हे उघडकीस आणून 12 लाख 78 हजार 450 रुपये किंमतीचे 33 तोळे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.
अजित व्यंकप्पा पवार (वय 30, रा.जेऊर, अक्कलकोट, सोलापुर) व संदिप अंकुश केत (रा. सम्राट चौक, अक्कलकोट, सोलापूर) असे ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी दिले होते. त्यानुसार युनिट पाचच्या पथकाने घरफोडी करणा-या टोळीचा तपास सुरू केला.या गुन्ह्यातील आरोपी औंरगाबादमधील वाळुंज येथे थांबल्याची महिती पथकातील पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी वाळूजमध्ये सापळा रचून आरोपी अजित पवार याला ताब्यात घेतले. त्याने तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल चोरीचा गुन्हा तीन साथीदारांसह केल्याची कबुली दिली.
आरोपी पवार याने चोरीचा मुद्देमाल संदिप अंकुश केत याच्याकडे दिला असल्याची माहिती दिली. त्यानुसार आरोपी केत याला ताब्यात घेऊन सहा दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली व मुद्देमाल जप्त करण्यात.आला. पोलिसांनी चार गुन्ह्यांची उकल करत 12 लाख 78 हजार 450 रुपये किंमतीचे 33 तोळे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.
ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त गुन्हे सुधीर.हिरेमठ, पोलीस उपायुक्त (परिमंडळ 2) आनंद भोईटे,.सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे 1) प्रशांत अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास इंगवले, सहायक पोलीस निरीक्षक राम गोमारे, पोलीस उपनिरीक्षक प्रसन्ना ज-हाड, पोलीस अंमलदार धनराज किरणाळे, दत्तात्रय बनसुडे, ज्ञानेश्वर गाडेकर, धनंजय भोसले, सावन राठोड, राजेंद्र साळूखे, मयुर वाडकर, नागेश माळी, संदीप ठाकरे,शामसुंदर गुट्टे, नितीन.बहिरट, दयानंद खेडकर, राजकुमार इघारे, भरत माने,.गोपाळ ब्रम्हांदे, गणेश महाडीक, सचीन मोरे, निलम.शिवथरे यांनी केली.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!