भिगवण बाजाराकडे ग्राहकांनी पाठ फिरवली; बाजार दिवशी शुकशुकाट

 

भिगवण :कोरोना विषाणूच्या फैलावामुळे ५० टक्के बाजार पेठेतील व्यवसायावर परिणाम झाला असून आर्थिक टंचाई मुळे ग्राहकांनी भिगवण आठवडे बाजार तसेच बाजार पेठेकडे पाठ फिरवली दिसत आहे

या करोना महामारी मुळे छोटे व्यवसाय हॉटेल सारखे व्यवसाय अडचणीत आले असून याचा परिणाम बाजरी पेठेत दिसत आहे याकाळात दरवेळी भिगवण बाजार व पेठ नागरिकांनी गजबजलेले असतात.या काळात ब्रँडेड कपडे, बूट, बॅग्ज यांच्यासह इतर वस्तूंना मोठी मागणी असते. मात्र महागाई वाढू लागल्याने रोजच्या गरजाच भागवता भागवता सर्व सामान्याचे नाकी नऊ येत असल्याने यावेळी ग्राहकांचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे दुकानदारांचे म्हणणे आहे.

देशभरात कोरोनाचा प्रसार सुरू झाला. त्यानंतर टाळेबंदी लागू करण्यात आली. आता अनलॉक अंतर्गत अर्थव्यवस्था रुळावर येत असली तरी नागरिकांची खरेदी क्षमता कमी झाल्याचे दिसून येत आहे. याचा परिणाम बाजारात व भिगवण पेठेत दिसून येत आहे. आठवडा बाजार दिवस असतानाही शहरातील मेन पेठे येथील बाजारात शुकशुकाट आहे. दर वेळी येथे या काळात मोठी गर्दी असते. मात्र, कोरोनाचा परिणाम बाजारावर व भिगवण मधील चौकात दिसून येत आहे.

नागरिक घराबाहेर पडत नाहीत. फक्त ५० टक्के गर्दी बाजारात आणि भिगवण मधील मेन पेठेत पाहायला मिळतेय. नागरिक कोरोला अजूनही घाबरत असून त्यामुळे घराबाहेर पडत नाहीत, असे काही दुकानदारांनी सांगितले. काही ग्राहक बाजारात फक्त फेरफटका मारण्यास येत असून खरेदी करण्यासाठी नाही, असेही त्यांनी सांगितले. दुसऱ्या एका दुकानदाराने म्हटले, कोरोनामुळे अनेकांचे नोकऱ्या जात आहेत. आर्थिक चणचण भासत आहे. त्यामुळे कपडे आणि बुटांच्या मागणी कमी झाली आहे. त्याचा बाजारावर परिणाम झाला आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.