येरवडा परिसरात दहशत पसरविणारा अट्टल गुन्हेगार कारागृहात स्थानबद्ध

पुणे :  येरवडा परिसरात दहशत पसरविणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला ‘एमपीडीए’ कायद्याअंतर्गत येरवडा कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे. या आरोपीवर खुनाचा प्रयत्न, वाहनांची तोडफोड, गंभीर दुखापत, जबरी चोरी, सदोष मनुष्यवध, बेकायदा हत्यार बाळगणे यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

अनिकेत जगन्नाथ काकडे (वय 23, रा.शेलार चाळ, येरवडा पुणे ) असे या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अनिकेत काकडे याच्यावर मागील सात वर्षात खुनाचा प्रयत्न, वाहनांची तोडफोड, गंभीर दुखापत, जबरी चोरी, सदोष मनुष्यवध, बेकायदा हत्यार बाळगणे यासारखे गंभीर सहा गुन्हे दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे परीसरात सार्वजनिक सुव्यवस्थेला बाधा निर्माण झाली होती. ‘एमपीडीए’ कायद्याअंतर्गत त्याला एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले आहे. या वर्षातील ही नववी कारवाई आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.