आरोपांमध्ये तथ्य नाही, त्यामुळे देशमुख राजीनामा देणार नाहीत ; शरद पवारांनी केली अनिल देशमुखांची पाठराखण
नवी दिल्ली : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी लिहिलेल्या पत्राची राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी चिरफाड केली आहे. ‘परमबीर सिंग यांनी दावा केल्याप्रमाणे सचिन वाझे आणि अनिल देशमुख यांची भेट न झाल्याचे पुरावे माझ्याकडे आहे’, असं शरद पवारांनी स्पष्टपणे सांगत अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी फेटाळून लावली.
शरद पवार यांनी नवी दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी शरद पवार यांनी परमबीर सिंग यांच्या पत्रावर नव्याने भूमिका मांडली’
‘अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याबाबत चर्चा सुरू आहे. माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांचे जे पत्र लिहिले होते. त्यामुळे सचिन वाझेंना भेटायला बोलावलं असा दावा करण्यात आला आहे. पण 6 ते 15 फेब्रुवारीपर्यंत देशमुख कोरोनाबाधित असल्यामुळे रुग्णालयात भरती होते. रुग्णालयातील कागदपत्रावरुन देखील देशमुख हॉस्पिटलमध्ये होते. त्यांना 15 फेब्रुवारीला डिस्चार्ज मिळाला आणि त्यानंतर 15 दिवसांचा होमक्वारंटाईन सांगितलं. देशमुख हॉस्पिटलमध्ये भरती असल्याचा रेकॉर्ड आहे. 15 ते 27 फेब्रुवारी पर्यंत होम कॉरन्टाईनचा सल्ला डॉक्टरांचा होता. त्यामुळे या दरम्यान अनिल देशमुख होम कॉरेन्टाईन होते. त्यामुळे केलेले आरोप हे तथ्यहीन होते. महाराष्ट्र एटीएस योग्य दिशेने तपास करत आहे, त्यांचा तपास विचलीत करण्यासाठी असे आरोप होत आहेत जेव्हा चौकशी होईल तेव्हा सत्य बाहेर येईल, असं पवार स्पष्ट केले.
एक महिना पोलिस आयुक्त शांत का बसले? : शरद पवार
फेब्रुवारीच्या मध्यात वसुलीच्या सूचना देण्यात आल्या असा जर परमबीर सिंग यांचा आरोप आहे. तर मग आरोप करण्यासाठी परमबीर एक महिना का थांबले असा सवाल देखील शरद पवार यांनी यावेळी उपस्थित केला आहे. मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात परमबीर सिंह यांनी मला आणि मुख्यमंत्र्यांना ब्रीफिंग दिलं होतं.
मायकल रोडवर स्फोटकं कुणी ठेवली, मनसुख हिरेन यांची हत्या कुणी केली, याचा तपास झाला पाहिजे. या सर्व चौकशीला विचलित करण्यासाठी हे सर्व प्रकार विरोधक करीत आहे, अशी टीकाही पवार यांनी केली.
‘अनिल देशमुख यांच्या प्रकारातील सर्व पुरावे माझ्याकडे आले आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याच्या प्रश्न उपस्थित होत नाही. मुख्यमंत्री समोर सर्व पुरावे आले असेल मला वाटते. चौकशीचा निर्णय मुख्यमंत्र्यांना घ्यायचे आहे, असं पवारांनी स्पष्ट केलं.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!