जम्मू काश्मीरमध्ये मध्यरात्रीपासून ऑपरेशन ; सुरक्षादलाने 3 दहशतवाद्यांना घातलं कंठस्नान

श्रीनगर :जम्मू-काश्मीरच्या शोपियांमध्ये सुरक्षा दलाला मोठे यश मिळाले असून 3 दहशतवाद्यांना ठार करण्यात आलंय. काश्मीर झोन पोलिसांनी याबाबत माहिती दिली. शोपियां जिल्ह्यातील मुनिहाल भागात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत दोन अज्ञात दहशतवादी ठार झाले.

शोपिया जिल्ह्यातील मुनिहाल भागात सुरक्षादलासोबत झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले. शोपियाच्या मुनिहाल भागात रात्री जवळपास 2 वाजता चकमक सुरु झाली. जम्मू काश्मीर पोलिस, लष्कर आणि सीआरपीएफकडून संयुक्त शोधमोहिम सुरु आहे. या शोधमोहिमेत सुरुवातील दोन दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याची माहिती समोर आली होते. या दोघांचे लष्कर ए तोयबाशी कनेक्शन असल्याचंही सांगितलं जात आहे.

गेल्या दोन आठवड्यापासून सुरक्षादलाने शोधमोहिम हाती घेतली आहे. याआधी 11 मार्चला शोधमोहिम सुरु केल्यानंतर 13 मार्चला दहशतवाद्यांशी चकमक झाली होती. तेव्हा एका दहशतवाद्याला ठार करण्यात आलं होतं.

11 मार्चपासून सुरक्षा दलांनी आतापर्यंत 7 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. यापूर्वी शोपियानमध्ये 13 मार्चच्या रात्री सुरू झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाने एक अतिरेकी ठार मारला होता. तसंच ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला होता. यामध्ये एम 4 कर्बाइन, 36 काडतुसे, 9600 रुपये जप्त केले होते. तसंच अनंतनागमध्ये जैशच्या दोघांना कंठस्नान घातलं होतं. त्यांच्याकडून एक 47 रायफल, पिस्तुल, ग्रेनेड आणि गोळ्या जप्त केल्या होत्या.

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.