दगडाने ठेचून ३७ वर्षीय व्यक्तीची हत्या, नागपूर हादरले

नागपूर : दगडानं ठेचून निर्दयीपणे एका ३७ वर्षीय व्यक्तीची हत्या केल्याची घटना नागपुरातीील  जुनी कामठीnयेथे समोर आली आहे.ही घटना सोमवारी पहाटे घडली आहे. विवेक हुमने (वय 37 वर्ष)असं हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर जिल्ह्याच्या जुनी कामठी येथील हदरास नगर जवळ 37 वर्षीय विवेक हुमने याची दगडानं ठेचून निर्दयीपणे हत्या करण्यात आली आहे. मात्र, या हत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत असून दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आलं आहे. त्यांची सध्या चौकशी सुरू आहे. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं असून खळबळ उडाली आहे. भल्या पहाटे झालेल्या या हत्येचं कारण नेमकं काय आहे, याचा तपास सध्या सुरू आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.