पुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटर पुन्हा सुरु केले जाणार – मुरलीधर मोहोळ

पुणे | राज्यात पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटर पुन्हा सुरु करण्यात येणार आहे. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी याबाबतची माहिती  दिली. नुकतंच पुण्यात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एक बैठक पार पडली. या बैठकीत त्यांनी याबाबतची माहिती दिली.

खासगी रुग्णालयात बेड उपलब्ध करुन देण्याच्या सूचना

गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरात कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळं शहरातील आरोग्य यंत्रणा सक्षम करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. पुणे शहरातील विविध भागात ५५० कोविड केअर बेड उपलब्ध आहेत. तर खासगी रुग्णालयात ही बेड उपलब्ध करुन देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असे आदेश पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.
पुणेकरांनी नियमांचं पालन करा

पुण्यातील जम्बो कोविड सेंटर पुन्हा सुरु करत आहोत. येत्या आठ ते दहा दिवसांत ५५० बेड उपलब्ध होतील. आज 55 बेड उपलब्ध होतील. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर खासगी हॉस्पिटल चालकांची बैठक आयुक्त घेणार आहे. त्यामुळे पुणेकरांनी नियमांचं पालन करावे, असे आवाहन मुरलीधर मोहोळ यांनी केले आहे.

काळजीची गरज नाही, यंत्रणा सज्ज : आयुक्त विक्रम कुमार 

पुण्यात 23 हजार सक्रिय रुग्ण आहेत. त्यापैकी फक्त 2 हजार 300 लोक हॉस्पिटलमध्ये आहेत. गेल्यावर्षीच्या तुलनेत सध्या कोरोनाची लक्षण सौम्य आहेत. गरज पडली तर जम्बो हॉस्पिटलमध्ये 800 बेड उपलब्ध करुन देण्याचीही तयारी आहे. काळजीची गरज नाही, यंत्रणा सज्ज आहे, असे पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार म्हणाले.

पुणे जिल्ह्यात आतापर्यंत विनामास्क कारवाईतून 28 कोटी रुपये जमा झाले आहेत. लोकांनी मास्क वापरणं आवश्यक आहे. महापालिका खासगी हॉस्पिटल सोबत बेड उपलब्ध करुन देण्याबाबत सांमजन्स करार करणार आहे. पुण्यातील दीनानाथ हॉस्पिटल, पुना हॉस्पिटल, सिम्बॉयसिस हॉस्पिटल यांसह इतर रुग्णालयासोबत हा करार केला जाणार आहे, असेही विक्रम कुमार यांनी सांगितले.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.