पुण्यात सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

पुणे : पत्नीला कमी शिकलेली आहेस, तुझी बायको होण्याची लायकी नाही, असे म्हणत तिचा शारिरीक व मानसिक छळ केल्याने विवाहितेने राहत्या घरात गळफास घेउन आत्महत्या केली. याप्रकरणी सासरच्या लोकांविरूद्ध भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना दोन दिवसांपुर्वी संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास आंबेगावमधील ओव्हीनिअर सोसायटीत घडली.

संगीता अनिल व्हावळे (वय 26) असे आत्महत्या केलेल्या विवाहितचे नाव आहे. याप्रकरणी पती अनिल व्हावळे, पद्मिनी व्हावळे, अनिल व्हावळे, कल्पना व्हावळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मुलीचे वडील संगीता यांचे वडील विलास पंडित (वय 55) यांनी.फिर्यादी दिली आहे.

संगीता आणि अनिल यांचे काही वर्षांपुर्वी लग्न झाले होते. लग्नानंतर अनिल पत्नी संगीताला तू कमी शिकलेली आहेस, तुझी बायको होण्याची लायकी नाही, तू जेलमध्ये जाउन आलेली आहेस असे म्हणून शारिरीक व मानसिक छळ केला. त्यामुळे छळास कंटाळून संगीताने 20 मार्चला राहत्या घरात गळफास घेउन आत्महत्या केली.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.