बेकायदेशीर व्हिडीओ गेम पार्लरवर हिंजवडी पोलिसांची कारवाई, एकाला अटक

पिंपरी चिंचवड :बेकायदेशीर व्हिडीओ गेम पार्लरवर हिंजवडी पोलिसांनी कारवाई करत एकाला अटक केली आहे. त्याच्याकडून 48 हजार 820 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई माणगाव येथे करण्यात आली.

तिमप्पा नारायन गानेगा (वय 35, रा. माणगाव, ता.मुळशी ) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे..

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माणगाव येथे एक व्हिडीओ गेम सेंटर बेकायदेशीरपणे सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी गेम सेंटरवर छापा टाकला. त्यात आरोपी तिमप्पा गेम सेंटर चालवत असताना आढळून आला.त्याच्याकडे गेम सेंटरच्या परवान्याबाबत चौकशी केली असता तो बेकायदेशीरपणे व्हिडीओ गेम सेंटर चालवत असल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी तिमप्पा याला ताब्यात घेऊन 48 हजार 820 रुपये किमतीचे इलेक्ट्रॉनिक्स मशीन, रोख रक्कम जप्त केली.हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.