माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची सर्वोच्च न्यायालयात धाव, सीबीआय चौकशीची केली मागणी

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी टाकलेल्या लेटर बॉम्बमुळे राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली. सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रा लिहून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केलाय. देशमुख यांनी सचिन वाझेला महिन्याला 100 कोटी रुपयांच्या वसुलीचं टार्गेट दिलं होतं, असा गंभीर आरोप सिंग यांनी केलाय. या पत्रावरुन आता सत्ताधाऱ्यांनी सिंग यांच्यावर उलट आरोप करायला सुरुवात केली आहे. अशा स्थितीत आता सिंग यांनी थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

परमबीर यांनी पत्रात लिहिलेल्या आरोपांची सखोल चौकशी करण्यासाठी याचिका दाखल केली आहे. एकूण 130 पानांची याचिका मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी दाखल केली आहे. एवढंच नाही या प्रकरणी सीसीटीव्ही फुटेज चौकशीची देखील मागणी केली आहे.

 

आपल्या याचिकेत परमबीर सिंह यांनी म्हटले आहे की, मी पत्रातून जे दावे केले आहेत, त्याची सीबीआयकडून चौकशी करण्यात यावी. यासह ऑफिसर रश्मि शुक्ला यांनी जो ट्रांसफर-पोस्टिंग संदर्भात रिपोर्ट दाखल केला आहे, त्याचा देखील तपास करण्यात यावा.

इतकंच नाही, तर परमबीर सिंह यांनी अपील केलं की, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरच्या सीसीटीव्हीची देखील तपासणी व्हावी, ज्यामुळे यासर्व गोष्ट स्पष्ट होतील.

परमबीर सिंग यांनी सुप्रीम कोर्टात केलेल्या याचिकेत नेमकं काय?

परमबीर सिंग यांनी आपल्या याचिकेत म्हटलंय, “गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या भ्रष्टाचाराबाबत मी केलेल्या तक्रारीची निप:क्ष, प्रभावहीन आणि कोणतीही बाजू न घेता चौकशी व्हावी. पुरावे नष्ट होण्यापूर्वी याची सतत्या तपासणे आवश्यक आहे.

अनिल देशमुखांनी फेब्रुवारी 2021 मध्ये त्यांच्या निवासस्थानी सचिन वाझे आणि संजय पाटील यांच्यासोबत बैठक घेतली होती. या दोघांच्या वरिष्ठांना डावलून ही बैठक झाली होती. त्या बैठकीत महिन्याला 100 कोटी रुपये गोळा करण्याचं टार्गेत अनिल देशमुखांनी दिलं होतं.

त्यापूर्वी 24 की 25 ऑगस्ट 2020 मध्ये , रश्मी शुक्ला, ज्या राज्य गुप्तचर यंत्रणेच्या आयुक्त आहेत, त्यांनीही पोलीस महासंचालकांना, पोस्टिंग किंवा बदलीमध्ये अनिल देशमुखांकडून भ्रष्टाचार होत असल्याचं सांगितलं होतं. मात्र त्यावेळी याप्रकरणात अनिल देशमुखांवर कोणतीही कारवाई न करता उलट रश्मी शुक्लांनाच सुनावण्यात आलं होतं.

मग गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अनेक तपासामध्ये हस्तक्षेप करुन पोलीस अधिकाऱ्यांना आपल्याला हव्या तशा सूचना देत होते, असा उल्लेख परमबीर सिंग यांनी आपल्या याचिकेत केला आहे.

अनिल देशमुख यांना शरद पवारांचा खंबीर पाठिंबा

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे असल्याचं दिसत आहे. कारण माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या पत्राची चिरफाड करताना, शरद पवारांनी अनिल देशमुखांच्या राजीनाम्याची आवश्यकता नसल्याचं म्हटलं आहे. त्यासाठी त्यांनी परमबीर सिंगांच्या पत्राचा दाखला दिला.

परमबीर सिंग यांनी फेब्रुवारीच्या मध्यात वसुलीच्या सूचना देण्यात आल्याचे सांगितले होते. माझ्याकडे कागदपत्र आहेत. त्यावरून 5 ते 15 फेब्रुवारीपर्यंत अनिल देशमुख हे कोरोनामुळे रुग्णालयात भरती होते. मी रुग्णालयातूनही ही माहिती घेतली आहे. देशमुख हॉस्पिटलमध्ये भरती असल्याचा रेकॉर्ड आहे आणि 15 ते 27 फेब्रुवारी पर्यंत होम कॉरेन्टाईनचा सल्ला डॉक्टरांचा होता. असं असताना सिंग कशाच्या आधारावर देशमुखांनी वाझेंना भेटून वसुलीचे आदेश दिल्याचं सिंग सांगत आहेत, असा सवाल पवारांनी केला.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.