“ए भाई, तू जो कोण असशील, माझ्यावर बोट उचलायचं नाही”, अमृता फडणवीस यांचा भाई जगताप यांना इशारा
मुंबई : नेहमीच ट्विटरवर चर्चेत असणाऱ्या अमृता फडणवीस यांनी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्यावर निशाणा साधला आहे. यावेळी ट्वीट करताना अमृता फडणवीस यांनी भाई जगताप यांचा एकेरी उल्लेख केलाय. मुंबई पोलिसांची खाती देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या बायकोच्या बँकेत कशाचा आधारावर वर्ग केली होती. याच उत्तर द्यावं, असा सावाल भाई जगताप यांनी उपस्थित केला होता. या प्रश्वाला उत्तर देताना अमृता फडणवीस यांनी भाई जगताप यांचा एकेरी उल्लेख केलाय. तसंच सरळ रस्त्यानं चालणाऱ्याला डिवचायचं नाही, असंही त्या ट्वीटमध्ये म्हणाल्या. दरम्यान, अमृता फडणवीस यांच्या ट्वीटमधील भाई जगतापांच्या एकेरी उल्लेखांची चांगलीच चर्चा रंगली आहे.
‘ए भाई, तू जो कोण असशील – माझ्या वर बोट उचलायचं न्हाय’ अशा शब्दांतच अमृता फडणवीस यांनी भाई जगताप यांच्यावर जोरदार पलटवार केला.
ए भाई , तू जो कोण असशील – माझ्या वर बोट उचलायचं न्हाय !
पोलिसांची खाती तुमच्याच राज्यत तुम्ही ‘UTI बैंक / Axis बैंक ‘ ला योग्यता पाहून दिली होती !
लक्षात ठेव, सरळ रस्त्याने चालणाऱ्या माणसांना डिवसायचे न्हाय ! @BhaiJagtap1 https://t.co/tny1xz4cMF— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) March 22, 2021
अमृता फडणवीस या एरवी महाविकासआघाडीतील पक्षांवर सातत्याने टीका करत असतात. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही थेट टीका करायला त्या मागेपुढे पाहत नाहीत. मात्र, त्यांच्या आताच्या ट्विटमधील भाषा नेहमीपेक्षा खूपच आक्रमक आहे. त्यामुळे आता भाई जगताप या ट्विटला काय प्रत्युत्तर देणार, याकडे राजकीय वर्तुळाच्या नजरा लागल्या आहेत.
भाई जगताप काय म्हणाले होते?
गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा मागणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी आधी पोलिसांची खाती बायकोच्या बँकेत कशाच्या आधारावर वर्ग केली होती याचे उत्तर द्यावं, असे भाई जगताप यांनी म्हटले होते. ही टीका अमृता फडणवीस यांच्या चांगलीच जिव्हारी लागल्याचे दिसत आहे.
काय आहे प्रकरण?
महाराष्ट्र राज्य पोलिस विभागात दोन लाखाहून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांचे वार्षिक पगार 11 हजार कोटींपेक्षा जास्त आहेत. काही वर्षांपूर्वी पोलिस विभागातील बहुतांश वेतन खाती ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’कडून अॅक्सिस बँकेत हस्तांतरित करण्यात आली होती. माजी मिसेस मुख्यमंत्री अमृता फडणवीस ‘अॅक्सिस बँके’त उच्च पदावर कार्यरत असल्यामुळे याचा संबंध जोडला जात होता.
देवेंद्र फडणवीस यांचं स्पष्टीकरण काय?
अॅक्सिस बँक किंवा सरकारी खात्यांशी संबंधित कोणत्याही बँकांची निवड मागील काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने केली होती. जर सरकारमधील एखाद्याला असं वाटतं, की माझी पत्नी त्या बँकेत काम करते, म्हणून ते माझ्या सरकारची बदनामी करु शकतात, तर तसं होणार नाही. माझी पत्नी कधीच सरकारी कार्यालयात आली नाही किंवा पाच वर्षांत एखाद्या सरकारी अधिकाऱ्याशी तिने भेट घेतलेली नाही, असं स्पष्टीकरण फडणवीस यांनी दिलं होतं.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!