खंडणी तसेच जबरी चोरी करणारे दरोडेखोर गजाआड, स्थानिक गुन्हे शाखेची उल्लेखनीय कामगिरी

राजगड;खंडणी तसेच जबरी चोरी करणारे आरोपी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद,आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे.

गजानन जिवराज कदम (वय ३२ रा. नसरापूर ता. भोर जी. पुणे) असे गुन्हा दखल केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, राजगड पोलीस स्टेशन गु. र. नं  १२७ /२०२१ भादवी कलम ३८६,३९२आर्म अक्ट ३(२५) नुसार दिनांक २३/०३/२०२१ रोजी गुन्हा दाखल झाला होता.सदर गुन्ह्याचा तपास करत असताना,राजगड पोलीस स्टेशन हद्दीत गोपनीय बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की सदर गुन्ह्यातील आरोपी गजानन कदम हा जिल्हा प्राथमिक शाळा नसरापूर याठिकाणी असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने तात्काळ त्याठिकाणी जाऊन आरोपी गजानन यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. त्याची वैदकीय तपासणी करुन पुढील कारवाई साठी राजगड पोलीस स्टेशन च्या ताब्यात दिले आहे.

सदर ची कामगिरी ही पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण श्री अभिनव देशमुख, सो श्री अप्पर पोलीस अधीक्षक मोहिते, सो श्री पोलीस उपअधीक्षक पाटील, सो  यांच्या आदेशानुसार नुसार स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री पद्माकर घनवट, सो व संदीप घोरपडे, सो यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई अमोल गोरे,पोसई निखील मगदूम, पोना सागर चंद्रशेखर, पोशी अमोल शेडगे, पोशी मंगेश भगत,पोशी अक्षय नवले, पो ना संतोष दावलकर यांनी केली आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.