कामशेत बाजारापेठेच्या मुख्य चौकात अपघाताची शक्यता
कामशेत;कामशेत कडून पवनानगर कडे जाणाऱ्या चौकात उड्डाण पुलाचे काम सुरू असून, एका बाजूला खोदकामदेखील करण्यात आले आहे. हा चौक वाहनचालकांसाठी जोखमीचा ठरत असला, तरी येथून दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. धूळ आणि वाहतुकीच्या कोंडीसोबतच येथे नेहमीच अपघाताचीदेखील शक्यता नाकारून चालणार नाही. वाहतूक पोलिसांनी याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे.
सकाळच्या वेळी लोणावळा ते पुणे धावणाऱ्या बसेस याच मार्गावरून भरधाव जातात. दरम्यान, या मार्गावर परिसरातील नागरिकांची गर्दी असते. परिणामी, भरधाव जाणाऱ्या बसेसमुळे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. उड्डाण पुलाच्या बांधकामामुळे नागरिक प्रचंड चिडलेले असून पुलाचे काम जलदगतीने व्हावे असे नागरिकांचे मत आहे.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!